चोरीच्या भीतीने थेट घराच्या छतावरच ठेवली स्कॉर्पिओ; 
राष्ट्रीय

Bihar Viral Video | ‘आइए ना हमरा बिहार में’ चोरीच्या भीतीने थेट घराच्या छतावरच ठेवली स्कॉर्पिओ; भन्नाट उपायाचा व्हिडिओ व्हायरल!

कामानिमितत्त परदेशात जाताना वाहन चोरीला जाऊ नये यासाठी शोधाला उपाय

Namdev Gharal

Bihar Viral Video कामासाठी परदेशात जायचे असल्याने स्वतःची आवडती चारचाकी चोरीला जाऊ नये म्हणून एका व्यक्तीने शोधलेली अनोखी शक्कल सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेचा विषय ठरली आहे. परदेशात कामासाठी जात असताना व घरी कोणी नसल्याने वाहन चोरीला जाऊ नये म्हणून बिहारमधील गोपालगंज येथील एका व्यक्तीने थेट क्रेन मागवून आपली महिंद्रा स्कॉर्पिओ दोन मजली घराच्या छतावरच पार्क केली आहे. या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

कामानिमित्त इस्त्रायल जाताना वाहन चोरीची भीती

याबाबत अधिक माहिती अशी की गोपालगंज जिल्ह्यातील मांझा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मीरा टोला गावातील हा प्रकार असल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित वाहनाचा मालक मनोज यादव हा कामाच्या निमित्ताने इस्रायलला जाण्याच्या तयारीत होता. व्हिडीओत म्हटले आहे की त्‍याची पत्‍नी येथे राहणार आहे. पण आपल्या अनुपस्थितीत गाडी जमिनीवर उभी ठेवल्यास ती चोरीला जाण्याची भीती त्याला वाटत होती. तसचे गाडीची देखभाल करण्यासाठी एक ड्रायव्हर ठेवला होता पण तोही काम सोडून गेल्याने गाडीची काळजी वाटत होती. गाडीची सुरक्षा लक्षात घेऊन काहीतरी भन्नाट उपाय यादव यांनी शोधला.

मागवली क्रेन व स्कॉर्पिओ चढवली छतावर

वाहन चोरीला जाऊ नये व ते सुरक्षीत राहवे यासाठी यादव यांनी चोरांना जिथे पोहचताच येणार नाही अशा ठिकाणी वाहन पार्क करण्याचे ठरवले. यासाठी त्‍यांनी एक अवजड क्रेन मागवली व स्कॉर्पिओ उचलली व थेट घराच्या गच्चीवर ठेवली. हायड्रोलिक क्रेन बोलावली आणि पूर्ण आकाराची महिंद्रा स्कॉर्पिओ क्लासिक गाडी अनेक मीटर हवेत उचलून घराच्या छतावर सुरक्षितपणे ठेवली. यावेळी शेजाऱ्यांनी याचा व्हिडीओ शूट केला व तो आता चांगलाच व्हायरल होत आहे.

गाडीच्या सुरक्षेसाठी जीपीएस, सीसीटीव्ही, पेड पार्किंग किंवा सुरक्षारक्षकाची मदत घेतली जाते; मात्र गाडी थेट घराच्या छतावर चढवून मनोज यादवने भन्नाट उपाय केल्यची चर्चा नेटकऱ्यांमध्ये रंगली आहे. सोशल मीडियावर आश्चर्य आणि मिम्सचा पाऊस पडत आहे. पण संबधित घराचा स्लॅब मजबूत आहे की नाही याची काही माहिती उपलब्ध नाही आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT