bank account file photo
राष्ट्रीय

Viral News: डोळ्यांवर विश्वास बसेना! बँक खात्यातील ११३ रुपयांचे २९४ कोटी झाले कसे? प्लंबर चक्रावला

एका छोट्याशा गावात राहणाऱ्या प्लंबरच्या बँक खात्यात अचानक तब्बल २९४ कोटी रुपये जमा झाले.

मोहन कारंडे

Viral News Bihar bank account mystery

गया : बिहारमधील गया जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात राहणाऱ्या प्लंबरच्या बँक खात्यात अचानक तब्बल २९४ कोटी रुपये जमा झाले. खात्यात केवळ ११३ रुपये शिल्लक असताना काही तासांत कोट्यवधी रुपयांची रक्कम दिसू लागल्याने संबंधित व्यक्तीसह गावकरीही आश्चर्यचकित झाले आहेत. या प्रकरणाची पोलिस आणि बँक प्रशासनाकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.

मस्तपुरा गावातील विकास कुमार हा व्यवसायाने प्लंबर आहे. गुरुवारी सकाळी त्याने आपल्या बँक खात्याची शिल्लक रक्कम तपासली असता त्याच्या खात्यात तब्बल ९४ कोटी रुपये जमा झाल्याचे दिसून आले. या अनपेक्षित घडामोडीमुळे तो हादरला. त्याने तातडीने गावातील स्थानिक नेत्यांना याची माहिती दिली. त्यांच्या सल्ल्यानुसार विकासने पोलिसांकडे धाव घेतली.

या संदर्भात पोलिसांनी सांगितले की, हे अत्यंत संवेदनशील आर्थिक प्रकरण आहे. बँकेचे रेकॉर्ड, सर्व्हर लॉग, व्यवहारांची माहिती, ट्रान्झॅक्शन आयडी तसेच संबंधित खात्यांची तपासणी केली जात आहे. ही रक्कम बँकेच्या तांत्रिक चुकीमुळे जमा झाली आहे की, यामागे कोणत्या प्रकारची आर्थिक फसवणूक आहे, याचा तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, विकास कुमारने या पैशांचा कोणताही वापर करण्याचा प्रयत्न केला नसल्याचे सांगितले. "मी एक साधा प्लंबर आहे. माझ्या खात्यात एवढी मोठी रक्कम असणे अशक्य आहे. हे पैसे कुठून आले याची मला कोणतीही माहिती नाही," असे तो म्हणाला.

विकासच्या म्हणण्यानुसार, एका ग्राहकाने पाठवलेल्या रकमेपैकी सुमारे १,३०० रुपये काढल्यानंतर त्याच्या खात्यात फक्त ११३ रुपये शिल्लक होते. मात्र गुरुवारी सकाळी अचानक खात्यातील शिल्लक ९४ कोटी रुपये झाली आणि संध्याकाळपर्यंत ती वाढून तब्बल २९४ कोटी रुपयांवर पोहोचली. या रहस्यमय आर्थिक व्यवहारामुळे परिसरात चर्चांना उधाण आले असून, तपासातून नेमके सत्य काय समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT