Bihar new government
नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीत रालोआने अभूतपूर्व यश मिळवले आहे. राज्यातील २४३ सदस्यांच्या विधानसभेत तब्बल २०२२ जागा जिंकल्यानंतर रालोआच्या नेत्यांमध्ये आता मंत्रीमंडळातील जागा वाटपाबाबत चर्चा सुरु आहे. नवीन सरकारी केव्हा स्थापन होणार, या प्रश्नाचे उत्तर जनशक्ती पक्षाचे (रामविलास) प्रमुख चिराग पासवान यांनी आज (दि. १६) माध्यमांशी बोलताना दिले.
केंद्रीय मंत्री आणि लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) प्रमुख चिराग पासवान म्हणाले की, बिहारमध्ये लवकरच सरकार स्थापन होईल. आज रात्रीपर्यंत मी वरिष्ठ केंद्रीय मंत्र्यांशीही बोलेन आणि ब्लूप्रिंट आज किंवा उद्या तयार होईल. आपल्याला २२ नोव्हेंबरपूर्वी सरकार स्थापन करावे लागेल. ते पूर्ण होईल," असे पासवान यांनी सांगितले. बिहार विधानसभेची मूदत २२ नोव्हेंबर २०२५ रोजी संपत आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीत २४३ जागांपैकी ८९ जागांवर भाजप विजय झाला आहे. जनता दल (युनायटेड) ने ८५ तर लोक जनशक्ती पक्षाने (रामविलास) १९ जागा जिंकल्या, हिंदुस्थानी अवाम मोर्चा (धर्मनिरपेक्ष) पाच आणि राष्ट्रीय लोक मोर्चाने चार जागा जिंकल्या आहेत. आरजेडीच्या नेतृत्वाखालील महागठबंधनला फक्त ३५ जागा मिळाल्या. राजदने २५, काँग्रेसने सहा, सीपीआय(एमएल)(एल) दोन, इंडियन इन्क्लूसिव्ह पार्टीने एक आणि सीपीआय(एम)ने एक जागा जिंकली. मुख्य आघाड्यांव्यतिरिक्त, एआयएमआयएमने पाच जागा जिंकल्या आणि बहुजन समाज पक्षाने एक जागा जिंकली. प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाची पाटी कोरीच राहिली आहे.