'जेडीयू'चे प्रमुख नितीश कुमार यांची आज पाटणा येथे झालेल्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत पक्षाच्या विधिमंडळ गटाचे नेते म्हणून निवडण्यात करण्‍यात आली. तसेच सम्राट चौधरी आणि विजय कुमार सिन्हा यांची नेते आणि उपनेते म्हणून निवडण्‍यात आले आहे. File Photo
राष्ट्रीय

Bihar Government Formation : बिहारमध्‍ये रालोआ सरकार 'जैसे थै'..! 'जेडीयू' विधिमंडळ गट नेतेपदी नितीश कुमारांची निवड

भाजपच्‍या सम्राट चौधरी, विजय सिन्‍हा यांची नेते आणि उपनेते म्हणून निवड

पुढारी वृत्तसेवा

Bihar Government Formation : बिहार विधानसभा निवडणुकीत जनता दल संयुक्‍त (जेडीयू) आणि भाजपने अभूतपूर्व विजय मिळवला. आता पुन्‍हा एकदा नितीश कुमार यांच्‍या नेतृत्त्‍वाखाली सरकार गुरुवारी (दि. २०) स्‍थापन होत आहे. पुढील सरकारमध्ये भाजपच्या कोट्यातून सम्राट चौधरी आणि विजय कुमार सिन्हा उपमुख्यमंत्री म्हणून कायम राहतील.

गुरुवारी रालोआ सरकार आठव्‍यांदा घेणार शपथ

'जेडीयू'चे प्रमुख नितीश कुमार यांची आज पाटणा येथे झालेल्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत पक्षाच्या विधिमंडळ गटाचे नेते म्हणून निवडण्यात करण्‍यात आली. त्‍यामुळे ते पुढील मुख्‍यमंत्री असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे. जेडीयू अध्यक्ष नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील आठवे एनडीए सरकार गुरुवारी (दि. १९) शपथ घेणार आहे. नितीश यांच्या नेतृत्वाखालील हे दहावे सरकार असेल.

सम्राट चौधरी, विजय कुमार सिन्‍हा यांची निवड

भारतीय जनता पक्षाने (भाजप) उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांना निरीक्षक म्हणून आणि केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल आणि माजी केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योती यांना पक्षाच्या विधिमंडळ पक्षनेते निवडण्यासाठी सह-निरीक्षक म्हणून पाटणा येथे पाठवले होते. बैठकीनंतर केशव मौर्य यांनी औपचारिकपणे सम्राट चौधरी आणि विजय कुमार सिन्हा यांची नेते आणि उपनेते म्हणून निवड जाहीर केली. मध्ये, सम्राट यांची विधिमंडळ पक्षनेते आणि विजय उपनेते म्हणून निवड झाली. त्यानंतर नितीश कुमार यांच्या नवव्या सरकारमध्ये दोन्ही नेते प्रथमच उपमुख्यमंत्री झाले. भाजप आमदारांच्या बैठकीत दोघांनाही त्यांच्या पदांवर कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. आतापर्यंत, बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकारमध्ये सुशील कुमार मोदी, तारकिशोर प्रसाद, रेणू देवी, सम्राट चौधरी आणि विजय कुमार सिन्हा यांनी वेगवेगळ्या टर्मसाठी उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT