Tejaswi Yadav Mai Bahan Man Yojna:
बिहार निवडणुकीचा पहिल्या फेरीतील प्रचार आता थंडावला आहे. मात्र हा प्रचार थंडावण्यापूर्वीच महाआघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन वातावरण चांगलंच तापवलं. त्यांनी यावेळी जनता ही बदल करण्याच्या मूडमध्ये आहे. यंदाच्या निवडणुकीत परिवर्तनाचं मतदार होणार आहे. जुनं सरकार लोकं उखडून टाकणार आहेत असा दावा केला.
याचबरोबर तेजस्वी यादव यांनी आमचं सरकार येताच आम्ही माई बहन मान योजाना लागू करणार असल्याची घोषणा केली. त्याचबरोबर यंदाच्या मकर संक्रांती म्हणजेच १४ जानेवारी रोजी राज्यातील माता आणि भगिनींच्या खात्यात संपूर्ण एका वर्षाचे तब्बल ३० हजार रूपये जमा करू असं आश्वासन तेजस्वी यादव यांनी दिलं. या सरकारच्या काळात जीविका दिदी खूप षोषण झालं आहे असं देखील तेजस्वी यादव यांनी सांगितलं. त्यांना या सरकारकडून काही मिळाल नसल्याचा दावा देखील त्यांनी केला.
तेजस्वी यादव यांनी जीविका दिदी ज्या कम्युनिटी मोबिलाईजर्स आहेत त्यांना कायम करण्याचं आणि त्यांना ३० हजार मानधन देण्याचं देखील आश्वासन दिलं आहे. तेजस्वी यांनी जीविका दिदींच्या कॅडरला देखील दर महिन्याला २ हजार मानधन देऊ अशी घोषणा केली आहे. त्याचबरोबर त्यांचा पाच लाखांचा वीमा आणि व्याज माफ करणार आहे. त्यांनी जर सरकार आलं तर जुनी पेन्शन देखील लागू करण्याचं आश्वासन दिलं आहे.
तेजस्वी यादव यांनी राज्यातील पोलीस, शिक्षक आणि आरोग्य सेवक यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांच्या बदल्या या होम टाऊनच्या ७० किलोमीटर परिघातच करणार असं देखील आश्वासन दिलं आहे. तेजस्वी यांनी शेतकऱ्यांसाठी देखील मोठी आश्वासनं दिली असून सरकार आल्यावर धान्यांच्या एमएसपीशिवाय प्रती क्विंटल ३०० रूपय, गहू पिकावर प्रती क्विंटल ४०० रूपये बोनस देणार असं सांगितलं.