Bihar Election Result : Bihar Election Result: संपूर्ण देशाचे लक्ष वेधलेल्या बिहार विधानसभा निवडणूक निकाल मतमोजणीत 'रालोआ'ने निर्णायक आघाडी घेतली आहे. २४३ जागांसाठीचे ट्रेंड जाहीर झाले आहेत, ज्यामध्ये एनडीए १६६ जागांवर तर महाआघाडी ७१ जागांवर आघाडीवर असल्याचे चित्र आहे. रालोआ स्पष्ट बहुमताकडे वाटचाल करत असल्याने केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी भाजप बिहार जिंकण्याच्या तयारीत असल्याचा विश्वास व्यक्त करत आता आमचा पुढील विजय हा पश्चिम बंगालमध्ये होईल, असे भाकीत केले आहे.
बिहारमधील बेगुसरायचे खासदार असणारे गिरीराज सिंह यांनी 'इंडिया टुडे'शी बोलताना सांगितले की, बिहारमधील जनतेला जंगल राज नको आहे. राज्यातील जनतेने सातत्याने अराजकता आणि भ्रष्ट नेतृत्त्व नाकारले आहे. मी बिहारमधील भाजपचा कार्यकर्ता म्हणून स्पष्ट सांगतो की, बिहारमध्ये आमचा विजय होणार हे निश्चित आहे. आता पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत आमचा पुढील विजय असेल.
बिहारमध्ये आमची वाटचाल विजयाकडे सुरु झाली आहे. आता आमचे पुढील लक्ष्य पश्चिम बंगाल आहे. सध्या या राज्यात अराजकता माजली आहे. संपूर्ण राज्य बाह्य हस्तक्षेप सुरु आहे. अखेर पश्चिम बंगालमधील जनताही हे सत्य ओळखेल. बिहार निवडणुकीचे निकाल मतदारांनी अराजकतेला नाकारले अहो. एनडीएच्या विकास-केंद्रित अजेंडाला पाठिंबा दिला आहे. बिहारमधील प्रत्येक जिल्ह्यात अभियांत्रिकी आणि वैद्यकीय महाविद्यालये उघडताना पाहतो. निकृष्ट दर्जाची 'चरवाहा विद्यालये' बदलली आहेत. ही प्रगती आहे,” असे ते म्हणाले.
आजच्या तरुणांनी पूर्वीच्या कुशासनाचे काळ पाहिलेले नसले तरी त्यांच्या वडिलांनी नसतील 'जंगल राज' पाहिले आहे. बिहार भ्रष्ट नेत्यांच्या हाती सोपवला जाणार नाही, असा विश्वास व्यक्त करत बिहारमधील सरकारच्या नेतृत्त्व आणि मुख्यमंत्री पदाबद्दलच्या गोंधळाची गरज नाही. राज्यात नितीश कुमारांच्या नेतृत्वाखालीच सरकार स्थापन होईल, असेही गिरीराज सिंह यांनी स्पष्ट केले. नितीश कुमार यांनी सरकारचे प्रभावी नेतृत्व केले आहे. गोंधळाची गरज नाही. जर हे आरजेडीबद्दल असते तर प्रश्न वेगळे असते. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले आहे. मग गोंधळ कुठे आहे?”, असा सवालही त्यांनी केला.