Bihar Election Result: संपूर्ण देशाचे लक्ष वेधलेल्या बिहार विधानसभा निवडणूक निकालाची मतमोजणीस प्रारंभ झाला आहे. आतापर्यतच्या ट्रेंडमध्ये सत्ताधारी भाजप आणि संयुक्त जनता दल आणि प्रमुख विरोधी पक्ष राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख उमेदवार हे आघाडीवर असल्याचे चित्र आहे. आज दुपारी बारावाजेपर्यंत निकाल स्पष्ट होणार आहे.
बिहार विधासभा निवडणुकीत अलिनगर विधानसभा निवडणूक ही बहुचर्चित ठरली आहे. येथे भाजप उमेदवार मैथिली ठाकूर यांनी सुरुवातीच्या मतमोजणीत आघाडी घेतली आहे. दरम्यान, आपलाच विजय निश्चित असल्याचा दावा मैथिली यांनी मतमोजणीच्या पूर्वसंध्येला केला. त्या म्हणाल्या, "मी माझ्या मतदारसंघात कठोर परिश्रम केले आहेत. त्याचे परिणाम उद्या लोकांच्या चेहऱ्यावर दिसतील. येथील लोकांकडून मला इतके आशीर्वाद मिळाले आहेत. मतदारांनी माझे उत्स्फूर्त स्वागत केले. मतदारांना पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार हवे आहेत."
बिहार विधानसभा निवडणुकीत सर्वांचे लक्ष माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांचे पूत्र तेजस्वी यादव आणि तेजप्रताप यादव यांच्या निकालाकडे लागले आहे. सुरुवातीच्या मतमोजणीत राघोपूर मतदारसंघातून निवडणूक लढविणार तेज प्रताप यादव आणि लालू प्रसादांनी कुटुंबातून हकापट्टी केलेले जनशक्ती जनता दलाचे अध्यक्ष तेज प्रताप यादव हे महुआ मतदारसंघात आघाडीवर आहेत. या जागेवर तेज प्रताप यादव यांचे राजकीय भवितव्य पणाला लागले आहे.