भाजप नेते जिबेश कुमार यांनी आज मंत्रीपदाची शपथ घेतली.  (Image source- X)
राष्ट्रीय

बिहार मंत्रिमंडळाचा विस्‍तार, भाजपच्‍या सात नेत्यांनी घेतली मंत्रीपदी शपथ

Bihar cabinet expansion : भाजपचे 'एक व्यक्ती, एक पद' धाेरण

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : बिहार राज्‍य मंत्रिमंडळाचा आज विस्तार झाला. भाजपच्‍या सात नेत्‍यांनी मंत्रीपदी शपथ घेतली. राज्‍यात या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार असल्‍याने हा विस्तार महत्त्वाचा मानला जात आहे.

नीतीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात संजय सरावगी (दरभंगा), डॉ. सुनील कुमार (बिहारशरीफ), जिबेश कुमार (जले), राजू कुमार सिंग (साहेबगंज), मोतीलाल प्रसाद (रीगा), विजय कुमार मंडल (सिक्ती) आणि कृष्ण कुमार मंटू (अमनूर) यांनी शपथ घेतली. तत्पूर्वी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप जयस्वाल यांनी महसूल मंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर केला मी महसूल मंत्रीपदाचा राजीनामा देणार आहे. 'एक व्यक्ती, एक पद' हे तत्व पक्षाचे काम करते. केंद्रीय नेतृत्वाने मला पक्षाच्या राज्य युनिटची जबाबदारी दिली आहे याबद्दल मी आभारी आहे. मंत्रिमंडळ विस्तार हा मुख्यमंत्र्यांचा विशेषाधिकार आहे, असे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

सध्या बिहारमध्‍ये मंत्रिमंडळाची संख्या ३० आहे. यामध्‍ये १५ भाजप मंत्री, १३ जद(यू), एक हिंदुस्थानी अवम मोर्चा (एचएएम) आणि एक अपक्ष आहे. सहा जागा रिक्त आहेत. शुक्रवारी बिहार अर्थसंकल्पीय अधिवेशनास प्रारंभ होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT