Rahul Gandhi Court Case pudhari
राष्ट्रीय

Rahul Gandhi Court Case: राहुल गांधींना मोठा दिलासा... संपत्ती प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा आदेश केला रद्द

राहुल गांधींच्या विरूद्ध कथित उत्पन्नापेक्षा जास्त संपत्तीचे प्रकरण सुरू होते. आज सर्वोच्च न्यायालयाने एक मह्तवाचा आदेश देत इलाहबाद उच्च न्यायालयाचा आदेश रद्द केला.

Anirudha Sankpal

Rahul Gandhi Court Case: काँग्रेस नेते आणि लोकसभा विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने आज मोठा दिलासा दिला. राहुल गांधींच्या विरूद्ध कथित उत्पन्नापेक्षा जास्त संपत्तीचे प्रकरण सुरू होते. आज सर्वोच्च न्यायालयाने एक मह्तवाचा आदेश देत इलाहबाद उच्च न्यायालयाचा आदेश रद्द केला. उच्च न्यायालयाने या प्रकरणात केंद्रीय तपास यंत्रणा सीपीआय आणि ईडीला तक्रारीत केले गेलेल्या आरोपांचे प्रतिज्ञापत्र आणि या प्रकरणात काय प्रगती झाली याची माहिती देण्याचे निर्देश दिले होते.

सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने या प्रकरणी नव्याने विचार करण्याचा आदेश इलाहाबाद उच्च न्यायालयाला दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना देखील पार्टी करण्याचे निर्देश दिले आहेत. राहुल गांधी यांच्याकडून वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद केला.

भाजप कार्यकर्त्याने केली होती तक्रार

या प्रकरणाची सुरूवात कर्नाटकमधील भाजप कार्यकर्ता एस. विघ्नेश शिशिर यांच्याकडून झाली होती. त्यांनी इलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल करून राहुल गांधी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी उत्पन्नाच्या ज्ञात स्त्रोतापेक्षा जास्त संपत्ती मिळवल्याचा आरोप केला होता. त्यांनी सीबीआय आणि ईडी तपासाची मागणी केली होती.

शिशिर यांनी आपल्या तक्रारीचे समर्थन करत काही दस्तऐवज न्यायालयात सादर केले होते. मात्र या कागदपत्रांबाबत आणि आरोपांबाबत प्रतिज्ञापत्र कोणत्याही तपास यंत्रणेने न्यायालयात दिले नव्हते.

अलाहबाद उच्च न्यायालयाचा निर्णय

इलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने मे २०२६ मध्ये या याचिकेवर सुनावणी करताना सीबीआय आणि ईडीला या तक्रारीत करण्यात आलेल्या आऱोपांबाबत कायदेशीर सत्यता तपासणे आणि प्रकरणाच्या तपासाची प्रगती कुठेपर्यंत आली आहे याची माहिती न्यायालयाला देण्याचे आदेश दिले होते.

तसेच न्यायालयाने जर तक्रार तपास यंत्रणांना मिळाली आहे तर आरोपांचे कायद्याच्या अनुशंगाने प्रतिज्ञापत्र तयार केले जाऊ शकते. तसेच न्यायालायने सीबीआय आणि ईडीला कायदेशीर योग्य पावले उचलण्याचे स्वातंत्र्य देखील दिलं होतं.

यानंतर २० जुलै रोजी उच्च न्यायालयाने सीबीआय़कडून दाखल कर करण्यात आलेल्या उत्तरावर देखील नाराजी व्यक्त केली होती. न्यायालयाचे म्हणणे होते की एजन्सीकडून दिलेल्या उत्तरात आधी दिलेल्या आदेशानुरूप पुरेशी माहिती नाहीये. त्यानंतर सीबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबतच्या प्रगतीचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश देण्यात आले.

राहुल गांधींची सर्वोच्च न्यायालयात धाव

इलाहाबाद उच्च न्यायालायच्या आदेशाविरूद्ध राहुल गांधी सर्वोच्च न्यायालयात गेले होते. त्यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशांना आव्हान दिले होते. राहुल गांधींच्या वतीने कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात युक्तीवाद केला. ही प्रक्रिया कायद्याला धरून नाही असे मत त्यांनी मांडले होते. याचिकाकर्त्यांची पात्रता आणि त्याचा हेतू याबाबत देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

यापूर्वी १७ ऑगस्टला सर्वोच्च न्यायालायने अंतरिम दिलासा दिला होता. त्यावेळी त्यांनी इलाहाबाद उच्च न्यायालयाला पुढची कारवाई स्थगित करण्याचे आणि सीबीआय, ईडी किंवा इतर एजन्सीला उच्च न्यायालयात रिपोर्ट सादर न करण्याचे निर्देश दिले होते. राहुल गांधी यांना आपली बाजू मांडण्याची कोणतीही संधी न देता उच्च न्यायालयाने आदेश का दिला असा देखील सवाल सर्वोच्च न्यायालयाने केला. आता हे प्रकरण पुन्हा अलाहाबाद उच्च न्यायालयात जाणार आहे. तिथं यावर नव्याने विचार होईल. यावेळी राहुल गांधी यांना देखील आपली बाजू मांडण्याची संधी मिळेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT