Bhubaneswar Bomb Blast file photo
राष्ट्रीय

Bomb Blast: थरारक! घराच्या छतावर बाँब बनवताना स्फोट; सराईत गुन्हेगारासह आईचाही होरपळून मृत्यू

Bhubaneswar Explosion news: एक सराईत गुन्हेगार आपल्या घराच्या छतावर बाँब बनवत होता. त्यावेळी अचानक झालेल्या भीषण स्फोटात त्याच्यासह आईचा होरपळून मृत्यू झाला.

मोहन कारंडे

भुवनेश्वर: ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमध्ये एक थरारक घटना उघडकीस आली आहे. एअरफील्ड भागात राहणारा एक सराईत गुन्हेगार आपल्या घराच्या छतावर बाँब बनवत होता. त्यावेळी तिथे त्याचे कुटुंबीयही उपस्थित होते. बाँब बनवत असताना अचानक झालेल्या भीषण स्फोटात त्याच्यासह आईचा होरपळून मृत्यू झाला.

शाहनवाज मलिक (वय २६) असे मृत्यू झालेल्या गुन्हेगाराचे नाव असून लिजातुन बीबी असे आईचे नाव आहे. या घटनेत त्याची होणारी पत्नी तृप्तिमयी महाल (वय २३) आणि त्याचा मित्र अमिया मल्लिक (वय २७) हे गंभीर जखमी झाले. ही घटना २७ जानेवारी रोजी घडली होती. घराच्या छतावर कथितरीत्या देशी बाँब बनवत असताना हा स्फोट झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तृप्तिमयी आणि अमिया मल्लिक यांच्यावर भुवनेश्वरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बाँबस्फोटाची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या फुटेजमध्ये एक भयानक दृश्य दिसत आहे. एका महिलेच्या हसण्याचा आवाज येतो आणि त्यानंतर लगेचच जोरदार स्फोट होतो. स्फोटानंतर तिथे एकच धावपळ उडते. आगीच्या ज्वाळा इतक्या तीव्र होत्या की महिलांचे कपडेही जळून खाक झाले, तर शाहनवाज मलिक गंभीररीत्या जखमी झाला. वेदना कमी करण्यासाठी तो पाण्याचा आधार घेताना सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे.

बदला घेण्याच्या उद्देशाने बनवत होता बाँब

मिळालेल्या माहितीनुसार, शाहनवाज मलिक हा कुणासोबत तरी बदला घेण्याच्या उद्देशाने देशी बाँब तयार करत होता. हे धोकादायक काम सूरू असताना त्याचे कुटुंबीय देखील त्याच्या अगदी जवळ बसले होते. या भीषण दुर्घटनेत शाहनवाज आणि त्याच्या आईचा जीव गेला, तर इतर दोन जण सध्या मृत्यूशी झुंज देत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT