पुढारी ऑनलाईन डेस्क - अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज (१ फेब्रुवारी) रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करत आहेत. या अर्थसंकल्पाकडून सामान्य जनता, विशेष करून मध्यवर्गाला अनेक अपेक्षा आहेत. दरम्यान, आज निर्मला सीतारामन यांनी पुस्तकांसाठी खास स्किमची घोषणा केली. डिजीटल फॉर्ममध्ये भारतीय भाषेतील पुस्तकं तयार करणार असल्याचे त्यांनी अर्थसंकल्पात नमूद केले. पुस्तक प्रेमींसाठी ही आनंदाची वार्ता आहे.