मुंबई : पुढारी ऑनलाईन
भय्यू महाराज यांच्या मातोश्री कुमुदिनी देवी यांचे निधन झाले. इंदौर येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्या घरी निधनाने वादंग सुरु झाला आहे. भय्यू महाराज यांच्या मातोश्री कुमुदिनी यांच्यावर आजारपणामुळे इंदौरमधील एका रुग्णालयात उपचार सुरु होते. शनिवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी समजताच भैय्यू महाराज यांची मुलगी कुहू पुण्याहून इंदौरला गेली. कुमुदिनी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याची इच्छा भय्यू महाराजांची कन्या कुहूने व्यक्त केली. मात्र महाराजांच्या दुसऱ्या पत्नी आयुषी यांनी आडकाठी केल्याने अंत्यसंस्कारावरुन दोघींमध्ये वाद झाला.
वाचा : राज्याचा कोणता प्रश्न सरकारने सोडवला? नारायण राणेंची विचारणा
स्मशानभूमीत जाताच तिने आयुषीला सांगितलं, की आजोबा आणि वडील भय्यूजी महाराज यांचे अंतिम संस्कारही मान्य केले होते, त्यामुळे हिंदू रितीप्रमाणेच कुमुदिनी यांच्यावरही मलाच अंत्यसंस्कार करू द्यायला हवे. मात्र, कुहू तिथे एकटी पडली. आयुषीच्या सोबत असलेल्या लोकांनी कुहूला अंत्यसंस्कार करू दिले नाहीत.
भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी आरोपी शरद आणि विनायकचे वकील धर्मेंद्र गुर्जर आणि आशिष चौरे यांचं म्हणणं आहे, की या प्रकरणाचा तपास व्हायला हवा. कारण याप्रकरणी त्यांची आई कुमुदिनी जबाब नोंदवणार होत्या. मात्र, हे अनेक काळापासून प्रलंबित राहिलं. घटनेची माहिती मिळताच फिर्यादींनी आयुषीसह मिळून कुमुदिनी देवींची साक्ष न घेण्यासाठी अर्ज दाखल केला होता. वकील धर्मेंद्र गुर्जर म्हणाले की, आरोपींशी चर्चा केल्यानंतर ते या मृत्यूच्या चौकशीसाठीही अर्ज करू शकतात.