धोतर नेसलेल्या शेतकऱ्याला शॉपिंग मॉलमध्ये प्रवेश नाकारणारा ANI 'X'
राष्ट्रीय

Bengaluru mall | धोतरवाल्‍या आजाेबांना प्रवेश नाकारला! माॅलला बसला जबर दणका

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: धोतर घालून आलेल्या एका वृद्ध शेतकऱ्याला बंगळूरमधील एका मॉलमध्ये प्रवेश नाकारल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. चित्रपटाचे तिकीट असूनही मॉलच्या प्रवेशद्वारावर एक वृद्ध शेतकरी आणि त्याच्या मुलाला थांबवल्याची घटना धक्कादायक आहे. या घटनेनंतर कारवाई करत, कर्नाटक सरकारने बंगळूरमधील 'हा' शॉपिंग मॉल आठवडाभरासाठी बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

बंगळूरमधील या प्रकरणात बुधवारी (दि.१७ जुलै) भारतीय न्याय संहिताच्या (BNS) कलम 126(2) (चुकीचा संयम) अंतर्गत शॉपिंग मॉलचा मालक आणि मॉलच्या सुरक्षा रक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असेही 'इंडिया टुडे'ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

बंगळूरमधील जीटी वर्ल्ड शॉपिंग मॉलमधील या घटनेनंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली. दरम्यान या घटनेचे पडसाद कर्नाटक विधानसभेतही उमटले. या घटनेवर विधानसभा सदस्यांनी आपआपली मतं मांडली. यावेळी नगरविकास मंत्री बिराथी सुरेश यांनी 'अशा वागणूकीसंदर्भात कारवाईसाठी कायद्यात तरतूद' आहे. मी नुकतेच आमच्या एका माजी आयुक्तांशी बोललो असून, सरकारला कायद्यानुसार सात दिवस मॉल बंद ठेवण्याची तरतूद या कायद्यात नमूद असल्याचे देखील, सुरेश यांनी गुरुवारी कर्नाटक विधानसभेत सांगितले.

बंगळूरच्या जीटी मॉलमध्ये नेमकं काय घडलं?

  • चित्रपटाचे तिकीट असूनही वृद्ध शेतकरी फकीरप्पा आणि त्यांच्या मुलाला मगडी मेन रोडवरील मॉलच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी थांबवल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी घडली.

  • सुरक्षा कर्मचाऱ्यांना आत जाऊ देण्याची विनंती करणारी वृद्ध व्यक्ती आणि त्याचा मुलगा यांचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला. त्यानंतर संपूर्ण शहरात या घटनेविरुद्ध संतापाची लाट उसळली.

  • कर्नाटकातील हावेरी जिल्ह्यातून हा शेतकरी आपल्या मुलाला भेटण्यासाठी बेंगळूरला आला होता. यानंतर तो त्याच्या मुलासह मॉलमध्ये आला होता. दरम्यान व्हायरल व्हिडिओमध्ये सुरक्षा कर्मचाऱ्यांचे बोलणे ऐकू येत आहे. संबंधित सुरक्षा रक्षक मॉलच्या नियम आणि धोरणात धोतर परिधान केलेल्या व्यक्तींना प्रवेश प्रतिबंधित करतो.

  • तो वृद्ध आणि त्याच्या मुलाने मॉलमधील सुरक्षारक्षकांना विनवण्या करूनही सुरक्षा कर्मचारी माघार घेत नाहीत. मॉलमध्ये जाण्यासाठी शेतकऱ्याने पॅन्टमध्ये बदल करावा अशी मागणीही त्यांनी यावेळी केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT