कोका-कोला गोदामातील चार कामगारांचा मृत्यू File Photo
राष्ट्रीय

Bengaluru Crime : कोका-कोला गोदामातील चार कामगारांचा मृत्यू

शेडमध्ये झोपेतच मृत्यू ः पोलिस तपास सुरू

पुढारी वृत्तसेवा

बंगळूर : होस्कोटे तालुक्यातील मुत्संद्रा गावात शनिवारी सकाळी झोपेत असताना चार मजुरांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. जयंत शिंदे (वय 25), नीरेंद्रनाथ (वय 24), दातर तिडे (वय 25) आणि धनंजय तिडे (वय 20) अशी मृतांची नावे आहेत.

चारही कामगार कोका-कोलाच्या गोदामात काम करत होते. त्यांना गोदामाजवळ बांधलेल्या शेडमध्ये राहण्याची परवानगी देण्यात आली होती. नेहमीप्रमाणे शुक्रवारी काम संपवून त्यांनी स्वयंपाक केला आणि जेवण झाल्यावर ते चौघेही बाहेर गेले होते. परतल्यानंतर ते शेडच्या खिडक्या आणि दरवाजे पूर्णपणे बंद करून झोपी गेले. शनिवारी ते मृतावस्थेत आढळले. झोपल्यानंतर गॅस गळतीमुळे गुदमरून त्याचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. सकाळी जेेव्हा इतर शेडमधील कामगार त्यांना कामावर बोलावण्यासाठी आले तेव्हा त्यांना झोपलेल्या स्थितीत चौघे मृत असल्याचे आढळले. सुलिबेले पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT