Amrut Distilleries Worlds Best Whiskey
अमृत डिस्टिलरीजने २०२४ इंटरनॅशनल स्पिरिट्स चॅलेंजमध्ये प्रतिष्ठेचा 'जगातील सर्वोत्कृष्ट व्हिस्की"चा खिताब जिकला आहे.  Amrut Distilleries
राष्ट्रीय

Worlds Best Whiskey | 'ही' भारतीय व्हिस्की ठरली जगातील 'बेस्ट व्हिस्की'! काय खास आहे त्यात?

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क

बंगळूर येथील अमृत डिस्टिलरीजने (Amrut Distilleries) लंडन येथे आयोजित २०२४ इंटरनॅशनल स्पिरिट्स चॅलेंजमध्ये (2024 International Spirits Challenge) प्रतिष्ठेचा 'जगातील सर्वोत्कृष्ट व्हिस्की"चा (World's Best Whiskey) खिताब जिकला आहे. अमृत ​​डिस्टिलरीजने जागतिक स्तरावर भारतीय डिस्टिलरीजसाठी एक नवा मानक प्रस्थापित करत "जागतिक व्हिस्की श्रेणी"मध्ये ५ सुवर्ण पदके मिळवली आहेत. अमृत ​​डिस्टिलरीजची ही सिंगल माल्ट व्हिस्की असून ही भारतातील सर्वात डेकोरेटेड व्हिस्कींपैकी एक म्हणून ओळखली जाते.

स्पिरिट्स चॅलेंज पॅनेलकडून अमृत डिस्टिलरीजचे कौतुक

द इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, या २९ व्या व्हिस्की चॅलेंजमध्ये जगभरातील व्हिस्की ब्रँड सहभागी झाले होते. त्यात स्कॉटलँड, आर्यलँड आणि जपानमधील प्रसिद्ध व्हिस्की ब्रँडचा समावेश होता. इंटरनॅशनल स्पिरिट्स चॅलेंज पॅनेलच्या निवेदनानुसार, अमृत डिस्टिलरीजने अपवादात्मक चव आणि गुणवत्तेच्या व्हिस्कीच्या उत्पादनासाठी डिस्टिलरीच्या समर्पणाची पुष्टी केली आहे.

Amrut ही देशातील पहिली सिंगल माल्ट व्हिस्की

दिवंगत राधाकृष्ण जगदाळे यांनी १९४८ मध्ये अमृत डिस्टिलरीजची सुरुवात केली होती. त्यांनी अमृत डिस्टिलरीजला आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्यासाठी त्यांच्या व्यवसायाचा कर्नाटकच्या बाहेर विस्तार केला. त्यांचे पुत्र नीळकंठ जगदाळे यांनी त्यांचा व्यवसाय पुढे नेला. अमृत ​​डिस्टिलरीज सुरुवातीला इंडियन मेड फॉरेन लिकर (IMFL) बनवत होती. त्यांची अमृत ही भारतातील पहिली सिंगल माल्ट व्हिस्की आहे. २००४ मध्ये स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे 'अमृत सिंगल माल्ट व्हिस्की' या नावाने ही व्हिस्की लाँच करण्यात आली होती. ब्रिटनमध्ये लाँच झाल्यानंतर २ वर्षांत ती स्कँडिनेव्हिया आणि पश्चिम युरोपमध्ये पोहोचली. ऑगस्ट २००९ मध्ये अमृत ही सिंगल माल्ट व्हिस्की ऑस्ट्रेलियात लाँच करण्यात आली. अशा प्रकारे ती जगभर पोहोचली.

SCROLL FOR NEXT