पुढारी ऑनलाईन डेस्क
घटस्फोट आणि मुलाच्या ताब्यासंदर्भातील खटल्यातून बायकोवर छळाचा आरोप करत आत्महत्या केलेल्या बंगळूर येथील आयटी कंपनी काम करणाऱ्या अतुल सुभाष याने जिवन संपवले होते. या प्रकरणानंतर देशभरात सोशल मिडीयावर कौटुंबिक न्यायालयाच्या व्यवस्थेवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अतूल सुभाष याचा भाऊ विकास कुमार याच्या तक्रारीवरुन बंगळूर पोलिसांनी अतुलची पत्नी निकितासह सासुरवाडीतील तिघांवर गुन्हा नोंदवला आहे. आता या गुन्ह्याचा तपासाकरीता बंगळूर पोलिसांचे पथक जौनपूर येथे पोहचले आहे. (Atul Subhash case )
उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील मुख्य न्यायालयात अतुल सुभाष व त्याची पत्नी निकिता सिंघानिया यांच्यातील घटस्फोटाचा खटला सुरु होता. येथील कौंटूंबिक न्यायालयाने अतूल सुभाष याच्याविरोधात निकाल दिला होता. या तणावातून अतूल सूभाष याने बंगळूर येथे जिवन संपवले होते. आता बंगळूर पोलिसांचे पथक जौनपूर येथे या केस संदर्भातील पुरावे गोळा करण्यासाठी जिल्हा न्यायालयात पोहचले आहे. या केसमध्ये गुन्हा दाखल झालेली अतुल सुभाष याची पत्नी व तिचे कुंटूंबियांना ताब्यात घेण्यासाठी गेले तिन दिवस येथे थांबून आहे. गुन्हा दाखल झाल्याने आरोपी सध्या फरार आहेत. (Atul Subhash case)