Banda Crime News Brother Kills Brother: बांदा मधील एका छोट्या भावाने आपल्या मोठ्या भावाची निघृण हत्या केल्याचे समोर आले आहे. छोटा भाऊ आशीष आणि मोठा भाऊ विकास यांच्यातील वाद वाढले. त्यानंतर हे दोघे जण एकमेकांच्या जीवावर उठले. दारूच्या नशेत आशीषने विकासच्या डोक्यात दगड घातला आणि विकास जागीच ठार झाला.
विशेष म्हणजे आशीष हा नुकताच बाप झाला होता. कुटुंबात आनंदाचं वातावण होता. मात्र या घटनेनंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी मृत विकासच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केलं. पोलिसांनी आईच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी आशीषला अटक करण्यात आली आहे.
ही घटना अतर्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. राजनगर इथं राहणाऱ्या आशीषच्या घरात छोट्या बाळाचा जन्म झाला होता. घरात कार्यक्रम सुरू होता. यावेळी आशीष आणि विकास हे दोन भाऊ दारू पिऊन वाद सुरू झाला. या दोघांचा पैशाच्या देवाण घेवाणीवरून वाद सुरू झाला होता. हा वाद इतका वाढला की दोघं हाणामारीवर आले. आशीषने विकासच्या डोक्यात आणि चेहऱ्यावर दगड मारले. त्यामुळं विकास जखमी झाली.
नातेवाईकांनी विकासला रूग्णालयात दाखल केलं. तिथं डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. कुटुंबियांनी सांगितलं की विकासचं अजून लग्न झालं नव्हतो. तो ट्रक ड्रायव्हर होता. तर आशीष हा पार्सल पोहचवण्याचं काम करतो. पोलिसांनी आईच्या तक्रारीनंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करून आशीषला अटक केली आहे.
याबाबत बोलताना एसपी प्रतिज्ञा सिंह यांनी सांगितलं की, अतर्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या आशीषने पैशाच्या कारणावरून आपला मोठा भाऊ विकासची डोक्यात दगड घालून हत्या केली. या प्रकरणी आईने तक्रार दिली होती. आरोपीला पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.'