नवी दिल्ली : गृह मंत्रालयाने पुन्हा एकदा दहशतवादाविरुद्ध मोठे पाऊल उचलले आहे. जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटवर (मोहम्मद यासीन मलिक गट) घातलेली बंदी आणखी पाच वर्षांसाठी वाढवली आहे.
गृह मंत्रालयाकडून सांगण्यात आले, की जेकेएलएफ-वायविरुद्ध मिळालेल्या पुराव्यानंतर ही बंदी वाढविण्यात आली आहे. गृह मंत्रालयाने 22 मार्च 2019 रोजी जेकेएलएफ-वायला अनधिकृत घोषित केले होते. ही संघटना अतिरेकी संघटनांच्या संपर्कात आहे.
जम्मू-काश्मीर आणि अन्य ठिकाणी दहशतवादाला समर्थन करत आहे. गृह मंत्रालयाने जम्मू-काश्मीर पीपल्स लीगच्या संघटना जेकेपीएल (मुख्तार अहमद वाजा), जेकेपीएल (बशीर अहमद तोता), जेकेपीएल (गुलाम मोहम्मद खान) आणि जेकेपीएल (अजीज शेख) वरही बंदी आणली आहे. या संघटना जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद वाढवणे आणि फुटीरतावादाला प्रोत्साहन देत होत्या.