मेरठमधील बहुचर्चित सौरभ राजपूत हत्‍या प्रकरणावर बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र शास्त्री यांनी आपले मत व्‍यक्‍त केले आहे.  
राष्ट्रीय

"देवाची कृपा, माझं लग्‍न झालेले नाही" : बागेश्‍वर बाबा असं का म्‍हणाले?

Meerut Murder Case : मेरठमधील सौरभ राजपूत हत्‍या प्रकरणावर दिली प्रतिक्रिया

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मेरठमधील सौरभ राजपूत हत्‍या प्रकरणाची देशभरात चर्चा सुरु आहे. साैरभच्‍या पत्‍नी आणि तिच्‍या प्रियकराने केलेल्‍या कृत्‍याने उत्तर प्रदेश हादरला आहे. या बहुचर्चित प्रकरणी बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Shastri) उर्फ बागेश्वर बाबा (Bageshwar Baba) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. (Meerut Murder Case)

सध्या देशात निळा ड्रम प्रसिद्ध....

सौरभ राजपूत हत्‍या प्रकरणी बोलताना धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा म्‍हणाले की, सध्या देशात निळा ढोल (निळा ड्रम) प्रसिद्ध आहे. यामुळे अनेक पतींना धक्का बसला आहे. देवाची कृपा आहे, माझं लग्‍न झालेले नाही. अशा प्रकारच्‍या घटना हे संगोपनातील दोष दर्शवतात. कुटुंबांनी त्यांच्या मुलांमध्ये योग्य संस्कार सुनिश्चित करण्यासाठी श्री रामचरितमानसाच्या शिकवणींचे पालन केले पाहिजे, असे आवााहनही त्‍यांनी यावेळी केले.

आपली कुटुंब व्यवस्था ढासळत चालली आहे

"मेरठची घटना दुर्दैवी आहे. कुटुंब व्यवस्था ढासळत चालली आहे, पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरणामुळे काही विवाहित पुरुष किंवा महिला आपले कुटुंबे उद्ध्वस्त करत आहेत. अशा प्रकारे कृत्‍य कोणाचा मुलगा किंवा मुलगी करत असेल तर याचा अर्थ संगोपनातील त्रुटी आहे. एक सुसंस्कृत कुटुंब निर्माण करण्यासाठी प्रत्येक भारतीयाने श्री रामचरितमानसाची मदत घेतली पाहिजे," असेही त्‍यांनी सांगितले.

काय आहे प्रकरण?

मेरठमधील ब्रम्‍हपूरी भागातील इंदिरानगर येथील मर्चंट नेव्हीत काम करणारा सौरभ राजपूत हा आपल्‍या पत्‍नीसोबत व पाच वर्षाच्या मुलीसोबत राहत होता. त्‍याची पोस्‍टिंग लंडनमध्ये होती. तो ४ मार्च रोजी सुट्टीवर घरी आला. त्‍याच रात्री त्‍याची हत्‍या करण्यात आली. पत्‍नी मुस्‍कान हिचे साहिल शुक्‍ला या तरुणाशी प्रेमसंबध होते. या दोघांनी सौरभच्या हत्‍येचा कट रचला.त्‍यांनी सौरभववर चाकूने सपासप वार केले. त्‍यानंतर त्‍याच्या शरीराचे तुकडे करुन एका प्लास्‍टिकच्या ड्रममध्ये भरले.त्‍यावर सिंमेट व पाणी ओतले. खून उघडकीस येऊ नये व दुर्गंधी येवू नये, म्‍हणून त्‍यांनी हा प्लॅन केला होता.यानंतर त्‍यांनी घराला बाहेरुन कुलूप लावले व पतीसोबत बाहेर फिरायला गेल्‍याचा बनाव मुस्‍कानने केला. पण तिने ही गोष्‍ट आपल्‍या आईला सांगितली. आईने या गुन्‍ह्याची माहिती पोलीसांना दिली. त्‍यानंतर हा धक्‍कादायक उघडकीस आला. पोलिसांनी ड्रम कापून सौरभचा मृतदेह बाहेर काढल्‍यानंतर या गुन्‍ह्याचा पदार्फाश झाला होता.

अत्‍यंत निर्घृणपणे सौरभची हत्‍या

मुस्‍कान व साहिलने अत्‍यंत निर्घृणपणे सौरभचा खून केल्‍याचे पोलीस तपासात समोर आले आहे. मुस्‍कान आणि साहिलने त्‍यांनी त्‍याच्या छातीत चाकू खूपसला. यानंतर त्‍याच्‍या शरीरावर वार केले. मृतदेहही अगदी क्रूरतेने कापला होता. सौरभचे मुंडके शरीरापासून वेगळे केले. त्‍यानंतर त्‍याचे दोन्ही हात कापून मृतदेह ड्रममध्ये भरला हाेता.

सौरभच्या हत्‍येनंतर दोघेही हिमाचलमध्ये फिरायला

सौरभ आणि मुस्‍कान या दोघांनी कुटुंबीयांचा विरोध पत्‍करुन 2016 मध्ये लव्ह मॅरेज केले होते. त्‍यांना ५ वर्षाची एक मुलगी आहे. सौरभ व मुस्‍कान यांच्यामध्ये हळूहळू दुरावा निर्माण झाला. मुस्‍कानचे साहिलशी प्रेमसंबध जुळले. सौरभ लंडनमध्ये काम करत होता व इकडे मुस्‍काने प्रेमसंबध सुरु होते. दोघांना सौरभचा काटा काढण्याचा कट रचला. .सौरभची हत्‍या करुन त्‍याचा मृतदेह ड्रममध्ये भरला. त्‍यानंतर हे दोघेही हिमाचल प्रदेशात फिरण्यासाठी गेले. मुस्‍कानने शेजार्‍यांना सांगितले होते की. ती पतीबरोबर फिरायला जाते.

मुस्‍कान आणि साहिल गेले होते ड्रग्‍जच्या आहारी

या प्रकरणातील दोन्ही आरोपी मुस्‍कान आणि साहिल हे पूर्णपणे अंमली पदार्थाच्‍या (ड्रग्‍ज) आहारी गेले होते. जिल्‍हा वैद्यकीय अधीक्षक डॉ. विरेश कुमार यांच्या मते जेलमध्ये येणाऱ्या प्रत्‍येक कैद्याची तपासणी केली जाते. त्‍याचप्रमाणे मुस्‍कान व साहिल यांची तपासणी केल्‍यावर ते पूर्णतः नशेच्या आहारी गेल्‍याचे लक्षात आले. त्‍यांच्यावर उपचार सुरु केले असून नशा मुक्‍तीसाठी औषधे सुरु केली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT