पुढारी ऑनलाईन डेस्क : योगगुरु रामदेव बाबा यांना एक प्रकरणात न्यायालयाने अवमान याचिकेवर कारवाईचा इशारा दिला आहे. याचा धसका घेत रामदेव बाबांनी हमदर्द नॅशनल फॉऊंडेशन इंडिया या कंपनीच्या रुह अफजा या उत्पादनाविषयी असलेला वादग्रस्त व्हिडीओ सोशल मिडीयावरून हटवण्याची तयारी दाखवली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की रुह अफजा या सरबताविषयी एका व्हिडीओतून रामदेवबाबांनी आपत्तीजनक टिपण्णी केली होती. याबाबत हमदर्द नॅशनल फाऊंडेशनने दिल्ली हायकोर्टात अवमान याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती अमित बंसल यांनी या याचिकेवर सुनावणी घेतली. यावेळी ते म्हणाले रामदेव बाबा या प्रकरणात प्रथमतः दोषी दिसत आहेत. त्यामुळे त्यांनी न्यायालयात प्रत्यक्ष हजर रहावे. यानंतर वकील राजीव नायर हे पतंजली व रामदेवबाबा यांच्यावतीने न्यायालयात हजर झाले. त्यांनी न्यायालयाला सांगितले की येत्या २४ तासांत सर्व माध्यमांतून हा व्हिडीओ हटवला जाईल.
आपल्या उत्पादनांची जाहिरात करत असताना रामदेव बाबांनी रूह अफजा सा सरबतााविषयी धार्मिक रंग देऊन टिपण्णी केली होती. रुह अफजा हे सरबत तुम्ही विकत घ्याल तर त्या कंपनीला पैसे जातो. जी कंपनी देशामध्ये मदरसे व जिहाद सारख्या गोष्टींना पैसा पुरवते. त्यामुळे हा शरबत विकत घेऊन तुम्ही ‘शरबत जिहाद’ चा प्रसार होतो त्यापेक्षा आमचा सरबत घ्या असे आवाहन ते करताना दिसतात.
या व्हिडीओमध्ये बाबा रामदेव हे आपली कंपनी पतंजलीच्या गुलाब नामक सरबताची जाहिरात करताना दिसतात. त्याचवेळी हमदर्द नॅशनल फॉऊंडेशन इंडिया या कंपनीच्या रुह अफजा या सरबाताला धार्मिक रंग देताना दिसत आहेत. या सरबाताच्या विक्रीतून आलेला पैशातू मस्जिद, मदरसे बनवले जातात. जे आजकाल लव्ह जिहाद , व्होट जिहाद यासारखे प्रकार सुरु आहेत तसाच हा शरबत जिहाद सुरु आहे. असे त्यांनी म्हटले आहे. त्यांचा हा व्हिडीओ चांगलाचा व्हायरल झाला असून त्याची दखल घेत न्यायमूर्ती अमित बंसल यांनी हा व्हिडीओ हटवण्यास सांगितले. त्यांनी यावर रामदेव बाबांना चांगलेच सुणावले.