ayushman card free treatment how check which hospitals offer free treatment under the scheme 2026
पुढारी ऑनलाईन : आयुष्मान कार्ड : देशात आजही अनेक कुटुंबे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत. अशा कुटुंबांसाठी गंभीर आजारांवरील उपचारांचा खर्च करणे आर्थिकदृष्ट्या कठीण ठरते. या गरजू कुटुंबांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारकडून आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राबवली जात आहे. या योजनेंतर्गत पात्र कुटुंबांना दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचारांची सुविधा दिली जाते.
मात्र, आयुष्मान कार्ड बनवून घेतल्यानंतरही अनेकांच्या मनात एक प्रश्न असतो की, या कार्डवर नेमक्या कोणत्या रुग्णालयात उपचार घेता येतात? आपल्या शहरातील सरकारी आणि खासगी रुग्णालये या योजनेशी संलग्न आहेत का? तुम्हालाही याबाबत जाणून घ्यायचे असेल, तर घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने याची माहिती मिळवता येते. चला तर जाणून घेऊया. पुढील स्लाइड्समध्ये याबाबत सविस्तर माहिती पाहूया...
आयुष्मान कार्डवर किती रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळतात?
- आयुष्मान भारत योजनेंतर्गत पात्र कुटुंबांना दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंतच्या आरोग्य विमा संरक्षणाची सुविधा दिली जाते.
- आयुष्मान कार्डची वार्षिक मर्यादा ५ लाख रुपये आहे. म्हणजेच, दरवर्षी या कार्डच्या माध्यमातून ५ लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार घेता येतात.
- उपचारांचा खर्च सरकारकडून केला जातो.
आयुष्मान कार्डवर कोणत्या रुग्णालयांमध्ये मोफत उपचार घेता येतात?
- आयुष्मान कार्डच्या माध्यमातून तुम्ही मोफत उपचार घेऊ शकता.
- मात्र, हे कार्ड सर्वच रुग्णालयांमध्ये चालत नाही.
- या योजनेत नोंदणीकृत असलेल्या सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्येच या सुविधेचा लाभ घेता येतो.
तुमच्या शहरातील नोंदणीकृत रुग्णालयांची यादी कशी तपासाल?
तुम्हालाही तुमच्या शहरातील कोणत्या रुग्णालयात आयुष्मान कार्डच्या माध्यमातून मोफत उपचार मिळू शकतात, हे तपासायचे असेल, तर सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
वेबसाइट : hem.nha.gov.in/search
त्यानंतर येथे पिनकोड, जिल्हा आदी माहिती भरून रुग्णालयांचा शोध घेता येतो.
यानंतर तुमच्या शहरातील कोणती रुग्णालये आयुष्मान भारत योजनेशी संलग्न आहेत, याची माहिती मिळेल. या यादीमध्ये अनेक खासगी आणि सरकारी रुग्णालयांचा समावेश असू शकतो.