Ayodhya Temple donation theft case | आरोपीच्या खात्यात मिळाले सव्वासात लाख; ‘सीईओ’पदासाठी १,००० हून अधिक अर्ज 
राष्ट्रीय

Ayodhya Temple donation theft case | आरोपीच्या खात्यात मिळाले सव्वासात लाख; ‘सीईओ’पदासाठी १,००० हून अधिक अर्ज

पुढारी वृत्तसेवा

अयोध्या; वृत्तसंस्था : अयोध्या श्रीराम मंदिर देणगी चोरी प्रकरणातील आरोपी रमाशंकर मिश्रा आणि सेवानिवृत्त बँक कर्मचारी सुभाष श्रीवास्तव या दोघांच्या पोलिस कोठडीत एक दिवसाची वाढ करण्यात आली. बुधवारी सकाळी ८ वाजता पोलिस फैजाबाद तुरुंगात पोहोचले. दोघांची चौकशी सुरू आहे.

आरोपींनी दानाचे पैसे कसे चोरले आणि ते कुठे लपवून ठेवले, याचा शोध पोलिस घेत आहेत. रमाशंकर याच्याकडे दानाची रक्कम मोजणी कक्षापर्यंत (काऊंटिंग रूम) पोहोचवण्याची जबाबदारी होती. पोलिसांना त्याच्या बँक खात्यात ७.३२ लाख रुपये सापडले आहेत. तर, सुभाष हा दान मोजणाऱ्यांवर देखरेख ठेवायचा; ताे एसबीआयचा सेवानिवृत्त कर्मचारी आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीराम मंदिराचे मुख्य कार्यकारी अधिकारी होण्यासाठी देशभरातून १,००० हून अधिक लोकांनी अर्ज केले आहेत. या भरतीची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर अवघ्या २४ तासांच्या आत निवड समितीच्या अधिकृत ई-मेलवर एवढ्या मोठ्या संख्येने अर्ज प्राप्त झाले. यामध्ये सर्वाधिक अर्ज सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी केले आहेत.

आरोपी लवकुशच्या पत्नीला प्राधिकरणाची ७ दिवसांची मुदत

आरोपी लवकुश मिश्राची पत्नी सुप्रिया मिश्रा वडिलांसह अयोध्या विकास प्राधिकरण कार्यालयात जात फैजाबाद येथील बांधकामाधीन घराशी संबंधित अपूर्ण कागदपत्रांबाबत तिने पत्र दिले. कागदपत्रे जमा करण्यासाठी तिने महिन्याचा वेळ मागितला; परंतु प्राधिकरणाने केवळ ७ दिवसांची मुदत दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT