राष्ट्रीय

Ayodhya Ram Mandir Inauguration : जगातील 50 भाषांतून रामायण

Arun Patil

भारत आणि जगातील एकूण 50 हून अधिक भाषांतून लिखित स्वरूपातील रामायण आहे. ओडिशाच्या ओडिया भाषेत सर्वाधिक 13 रामायणे आहेत. जगभरात 400 हून अधिक प्रकारच्या रामकथा आहेत. हजारो लोककथा आहेत. पुस्तके आणि कथा आहेतच. अनेक ऐतिहासिक संदर्भही असे उपलब्ध झाले आहेत.

जगभरात अनेक पुरातत्त्वीय पुरावेही असे उपलब्ध झालेले आहेत की, राम केव्हा होऊन गेले याबाबत वाद ठिक असला, तरी राम झाले की नाही, याबद्दलचे वाद निरर्थक ठरतात. राम हे एक आंतरराष्ट्रीय सत्य असल्याचे प्रकर्षाने समोर येते. लोक परंपरा, इतिहास तसेच अनेक पुरातत्त्वीय पुराव्यांनीही राम हे वैश्विक सत्य असल्याचे सिद्ध झालेले आहे. चीन, जपान, मंगोलिया, कोरियाच नव्हे, तर इराकसह इटलीतूनही श्री रामलल्लाचे संदर्भ समोर आलेले आहेत. जपानचे युगो साको यांनी बनविलेला 1993 मध्ये प्रदर्शित झालेला 'रामायण' हा चित्रपट तर केवळ अद्वितीय!

SCROLL FOR NEXT