Ayodhya Ram Mandir Donation Pudhari
राष्ट्रीय

Ayodhya Ram Mandir Donation: PMO ने राम मंदिरात आलेल्या दान निधीचा मागितला हिशेब; राम जन्मभूमी ट्रस्टने दिला स्पष्ट नकार

Anirudha Sankpal

Ayodhya Ram Mandir Donation: अयोध्या राम मंदिरातील दान आणि चढावामध्ये घोटाळा झाल्या आरोप झाल्यानंतर आता या प्रकरणी रोज नवनवे खुलासे होत आहे. श्रीराम जन्मभूमी मंदिर तीर्थ क्षेत्र ट्रेस्टने पंतप्रधान कार्यालयाला (PMO) जिल्हा प्रशासनाच्या संदर्भ पत्राच्या आधारे सुरू असलेल्या एआयटी तपासाचा हवाला देत आर्थिक माहिती देण्यास नकार दिला आहे.

भाजप नेत्याने PMO ला लिहिलं पत्र

पंतप्रधान कार्यालयाने अयोध्येतील स्थानिक भाजप नेते रजनीश सिंह यांच्याद्वारे लिहिलेल्या पत्रावर ज्यावेळी जिल्हा प्रशासनाने राम मंदिर ट्रस्टकडून उत्पन्न खर्च, दान, बँक खाती, जमिनीचे व्यवहार आणि संपत्तीबाबत माहिती मागवली होती. मात्र तपासाचा हवाला देत ट्रस्टने ही माहिती देण्यास स्पष्ट नकार दिला.

भाजप नेते रजनीश सिंह यांनी राम जन्मभूमी कीर्थ क्षेत्र ट्रस्टला आर्थिक व्यवहार, दान, जमीन खरेदी यात घोटाळ्या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं होतं. रजनीश सिंह यांनी पीएमओला मंदिर ट्रस्टला निर्देश देण्यात यावेत अशी मागणी केली होती. त्यांनी ही सर्व आर्थिक माहिती सार्वजनिक करण्याची मागणी केली होती.

भाजप नेत्याकडून तक्रार

राम मंदिर दान चोरी प्रकरणी भाजपचे स्थानिक नेता डॉक्टर रजनीश सिंह यांनी पंतप्रधान कार्यालयाला दोनवेळा पत्र लिहिलं होतं. रजनीश सिंह यांनी पहिल्यांदा ९ जून रोजी पत्र लिहिलं होतं. त्यांनी मंदिर ट्रस्टला सुरूवातीपासून आतापर्यंतच्या सर्व आर्थिक व्यवहारांची माहिती सार्वजनिक करण्याचे निर्देश देण्यात यावे अशी मागणी केली होती. त्यानंतर त्यांनी १२ जून रोजी अजून एक पत्र लिहून राम मंदिर दान संदर्भातील माहिती सार्वजनिक करावी अशी मागणी केली. या प्रकरणी १३ जून रोजी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे.

चंपत राय यांनी दिला नकार

दरम्यान, भाजप नेत्याच्या मागणीवर पीएमओने जिल्हा प्रशासनाला याबाबत लक्ष घालण्यास सांगितलं होतं. त्यानंतर अयोध्या जिल्हा प्रशासनाने पीएमओच्या निर्देशाचा हवाला देत श्रीराम मंदिर ट्रस्टशी संपर्क केला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २३ जून ला अयोध्या प्रशासनाने राम मंदिर ट्रस्टचे चंपत राय यांच्याशी संपर्क केला होता.

दरम्यान चंपत राय यांनी प्रशासनाला सध्या एसआयटी तपास सुरू असून पॅनल सर्व महत्वाचे रेकॉर्ड आणि माहिती एकत्र करत आहे. त्यामुळं आता मागणी करण्यात आलेली माहिती आम्ही देऊ शकत नाही असं सांगितलं

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT