India-Pakistan Conflict Are ATMs really shutting down for 2–23 days?
नवी दिल्ली दिल्ली : भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर अनेक बातम्या व्हायरल होत आहेत. दरम्यान देशभरातील एटीएम बंद होणार असल्याचा मेसेज सध्या व्हॉट्सअॅपवर फिरत आहे. यावर प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने (PIB) 'या' मेसेजविषयी सत्य माहिती समोर आणली आहे.
ATM सेवा नेहमीप्रमाणे सुरू राहिल
प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) ने व्हायरल झालेल्या त्या खोट्या व्हॉट्सअॅप मेसेजचा खंडन करत स्पष्ट केले आहे की, "देशभरातील एटीएम २-३ दिवसांसाठी बंद राहणार" असा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, यात कोणतेही तथ्य नसून अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पीआयबीने केले आहे. "देशभरातील एटीएम नेहमीप्रमाणे सुरू राहतील", असंही पीआयबीने एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
PIBचे भारतीय नागरिकांना आवाहन
व्हॉट्सअॅपवर मोठ्या प्रमाणावर पसरलेला हा दिशाभूल करणारा संदेश काही नागरिकांमध्ये नकळत भीती निर्माण करीत होता. मात्र, PIB ने नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा अप्रमाणित आणि भ्रामक माहितीवर विश्वास ठेवू नका आणि ती पुढे शेअर करू नका.