पुढारी ऑनलाईन डेस्क : आतिशी २१ सप्टेंबर रोजी दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील, असे निवेदन आम आदमी पार्टीने आज (दि.१९) प्रसिद्ध केले आहे. आतिशी यांच्याबरोबर अन्य मंत्रीही शपथ घेतील,असेही पक्षाने स्पष्ट केले आहे. त्यांच्यासोबत इतर मंत्रीही शपथ घेतील," असे आम आदमी पार्टीने एका निवेदनात म्हटले आहे.
मंगळवारी माध्यमांशी बाेलताना आतिशी म्हणाल्या हाेत्या की, "अरविंद केजरीवाल यांनी माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल मला आनंद आहे; परंतु त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे दुःखही आहे. येत्या काही महिन्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर केजरीवाल यांना मुख्यमंत्री म्हणून परत आणणे हेच आपले काम असेल."
43 वर्षीय आतिशी या सुषमा स्वराज आणि शीला दीक्षित यांच्यानंतर दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री असतील. त्या एक प्रमुख AAP नेत्या आहेत आणि त्यांनी मनीष सिसोदिया शिक्षण मंत्री असताना त्यांच्या सल्लागार म्हणून काम केले होते. 2013 च्या विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या घोषणापत्र मसुदा समितीचे प्रमुख सदस्य होत्या. त्यांनी पक्षाच्या प्रवक्त्या म्हणूनही काम केले आहे. त्या दिल्ली विधानसभेत कालकाजी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. केजरीवालांना अटक झाल्यानंतर दिल्ली सरकारमध्ये त्यांच्याकडे सर्वाधिक खाती ही त्यांच्याकडेच हाेती.