Faizan Sheikh | घातपाताचा कट उधळला; इस्लामविरोधी बोलणार्‍या ७ जणांचा गेम करण्याच्या तयारीत होता फैजान शेख File Photo
राष्ट्रीय

Faizan Sheikh | घातपाताचा कट उधळला; इस्लामविरोधी बोलणार्‍या ७ जणांचा गेम करण्याच्या तयारीत होता फैजान शेख

गुजरात एटीएसकडून संशयित दहशतवाद्याला अटक

पुढारी वृत्तसेवा

अहमदाबाद; वृत्तसंस्था : सोशल मीडियावर इस्लाम व मुस्लिमांच्या विरोधात आक्रमक आणि प्रक्षोभक विधाने करणार्‍यांना ‘धडा शिकवण्याच्या’ उद्देशाने फैजान शेख या संशयित दहशतवाद्याने सात व्यक्तींच्या हत्येचा कट रचला होता. गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) नवसारी येथून फैजानला अटक केलेल्यानंतर त्याच्या चौकशीतून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. मूळचा उत्तर प्रदेशातील रामपूरचा असलेला फैजान हत्येसाठी एक ‘रिव्हॉल्व्हर’देखील खरेदी केल्याचे सांगितले जात आहे. जैश-ए-मोहम्मद आणि अल-कायदा या दहशतवादी संघटनांच्या विचारसरणीने तो पूर्णपणे प्रभावित होता. फैजानच्या अटकेमुळे धार्मिक भावना भडकवून हिंसाचार घडवण्याचा दहशतवादी कट उधळून लावण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आले आहे.

फैजान शेखला एटीएसने 25 जानेवारी रोजी नवसारी येथील चारपूल परिसरातून ताब्यात घेतले होते. त्याच्या मोबाईल फोनच्या फॉरेन्सिक तपासातून एटीएसच्या हाती महत्त्वाचे पुरावे लागले आहेत. मूळचा उत्तर प्रदेशातील रामपूरचा असलेला फैजान गेल्या काही वर्षांपासून नवसारीमध्ये टेलरिंगचे (शिवणकाम) काम करत होता. त्याने शिवणकामातून मिळालेले पैसे साठवून त्यातून हत्येसाठी एक ‘रिव्हॉल्व्हर’ खरेदी केली होती.

अल-कायदाचे ‘नवीन रॅडिकल मॉडेल’

दहशतवादी संघटना तरुणांना जाळ्यात ओढण्यासाठी एका नवीन पद्धतीचा वापर करत असल्याचे एटीएसच्या तपासात समोर आले आहे. यामध्ये सोशल मीडियावर हिंदुत्वाचा आक्रमक प्रचार करणार्‍यांचे व्हिडीओ आणि पोस्ट मुस्लिम तरुणांना दाखवले जातात. त्याद्वारे त्यांच्या धार्मिक भावना भडकवून त्यांना दहशतवादाकडे वळवले जाते. फैजान शेख हा याच जहाल मॉडेलचा एक भाग होता. तो ‘गाझा’ नावाने सोशल मीडियावर सक्रिय राहून जैशच्या दहशतवाद्यांचे व्हिडीओ प्रसारीत करत असे.

फैजानच्या रडारवर होते हे सात जण

गुजरात एटीएसच्या तपासात निष्पन्न झाल्यानुसार, फैजान शेखने सोशल मीडियावरील पोस्टच्या आधारावर सात जणांची हिटलिस्ट तयार केली होती. यामध्ये दक्ष चौधरी, गौरव राजपूत, अभिषेक ठाकूर, डॉ. प्रकाश, युधी राणा, अक्कू पंडित आणि विक्रांत यांचा समावेश आहे. हे लोक सोशल मीडियावर इस्लाम आणि मुस्लिमांच्या विरोधात आक्रमक पोस्ट करण्यासाठी ओळखले जातात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT