दिसपूर : आसाममध्ये जर एखाद्या हिंदूने मुस्लिमाला, मुस्लिमाने हिंदूला किंवा ख्रिश्चन, बौद्ध वा जैन यांसारख्या इतर धर्माच्या व्यक्तीला जमीन विकल्यास, तो ‘आंतर-धार्मिक व्यवहार’ मानला जाईल. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी बुधवारी घोषणा केली की, आसाम मंत्रिमंडळाने विविध धर्मांच्या लोकांमध्ये होणार्या जमीन व्यवहारांसाठी एक नवीन मानक संचालन प्रक्रिया लागू केली आहे.
नव्या नियमांनुसार, जर एखाद्या हिंदूने मुस्लिमांना, मुस्लिमाने हिंदूंना किंवा ख्रिश्चन, बौद्ध वा जैन यांसारख्या इतर धर्माच्या व्यक्तीला जमीन विकल्यास, तो ‘आंतर-धार्मिक व्यवहार’ मानला जाईल आणि त्यासाठी सविस्तर पडताळणी प्रक्रियेतून जावे लागेल.
कॅबिनेट बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री सरमा म्हणाले की, आसामसारख्या संवेदनशील राज्यात दोन धार्मिक गटांमधील जमीन हस्तांतरण अत्यंत काळजीपूर्वक हाताळण्याची गरज आहे. जमीन व्यवहाराचा अर्ज सर्वप्रथम मंडल अधिकार्याकडे जमा करावा लागेल.