राष्ट्रीय

हैदराबादमध्ये असदुद्दीन ओवेसी सलग पाचव्यांदा विजयी; म्‍हणाले, मोदींना रोखण्यासाठी…

निलेश पोतदार

नवी दिल्‍ली; पुढारी ऑनलाईन : हैदराबाद लोकसभा जागेवरून असदुद्दीन ओवेसी लागोपाठ पाचव्यांदा विजय संपादन केला आहे. गेल्‍या २५ वर्षात प्रत्‍येकवेळी त्‍यांच्या यशाचे अंतर हे वाढतच निघाले आहे. २००४ साली जिथे त्‍यांच्या यशाचे अंतर ३७ टक्‍के होते ते आता वाढून ६१ टक्‍के इतके झाले आहे.

लोकसभा निवडणुकीचे निकाल नुकतेच घोषित झाले. भाजपच्या नेतृत्‍वाखालील एनडीएने २९२ तर विरोधी पक्ष इंडिया आघाडीने २३४ जागेवर यश मिळवले. यामध्ये अनेक जागेंचे निकाल असे आहेत, ज्‍यांची देशभरात चर्चा झाली. अशीच एक सीट आहे ती म्‍हणजे तेलंगणातील हैदराबाद लोकसभेची जागा. इथे AIMIM प्रमुख ओवेसींनी यश मिळवले आहे. त्‍यांनी तब्‍बल ३ लाख ३८ हजार मताधिक्याने विजय मिळवला आहे.

ओवेसी सलग पाचव्यांदा खासदार

भारतीय जनता पक्षाने (भाजप) येथून माधवी लता यांना उमेदवारी दिल्याने ही जागा संपूर्ण निवडणुकीत चर्चेचा विषय ठरली. त्यांना हिंदुत्वाचा चेहरा म्हणून पुढे करण्यात आले. मात्र, या ध्रुवीकरणात भाजपला यश मिळू शकले नाही आणि या जागेवरून माधवी लताचा पराभव झाला. असदुद्दीन ओवेसी सलग पाचव्यांदा या जागेवरून खासदार झाले आहेत. गेल्या 25 वर्षात प्रत्येक निवडणुकीत त्यांच्या विजयाचे अंतर वाढतच आहे.

विजयानंतर ओवेसी काय म्हणाले?

हैद्राबाद मतदारसंघातून दणदणीत विजय मिळवल्यानंतर असदुद्दीन ओवेसी म्हणाले, 'ज्यांनी AIMIM ला पाठिंबा दिला त्यांचे मी आभार मानतो. जादुई आकडा गाठण्यात भाजपला यश आलेले नाही. याचे कारण भाजपचा द्वेष पसरवणे आणि शेतकऱ्यांना त्रास देणे हे आहे. देशाने आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. मोदींची तिसरा टर्म रोखण्यासाठी कोणी सरकार स्थापन केले तर आम्ही त्याला पाठिंबा देऊ.

कोण आहेत माधवी लता?

भाजपच्या उमेदवार माधवी लता यांची ओळख समाजसेविका म्हणून आहे. तिहेरी तलाकच्या मुद्द्यावर त्‍यांनी अनेक मुस्लिम महिला गटांसोबत काम केले आहे. त्यांनी निराधार मुस्लिम महिलांसाठी मदत निधीही तयार केला आहे. भाजपने त्यांना हिंदुत्वाचा चेहरा बनवून हैदराबादमधून उमेदवारी दिली होती.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT