राष्ट्रीय

प्रचार संपताच पंतप्रधान मोदी ध्यानधारणेसाठी जाणार कन्याकुमारीला

Shambhuraj Pachindre

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणूकीच्या अंतिम टप्प्याचा प्रचार संपताच पंतप्रधान नरेंद्र मोदी ध्यानधारणेसाठी कन्याकुमारीला जाणार आहेत. गेल्या दीड महिन्यापासून लोकसभा निवडणुकीसाठी जाहीर सभा, रोड शोच्या माध्यमातून मोदींचा जोरदार प्रचार सुरु आहे. प्रचाराचा हा क्षीण भागविण्यासाठी मोदी हे ३० मे ते १ जूनदरम्यान ध्यानधारणा करण्याच्या उद्देशाने कन्याकुमारीला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

या दौऱ्यात पंतप्रधान मोदी हे रॉक मेमोरियलला भेट देतील. स्वामी विवेकानंद यांनी ध्यानधारणा केलेल्या पावनस्थळावर मोदी ध्यानधारणा करणार आहेत. हा दौरा आध्यात्मिक असून त्यात कुठलेही राजकीय कार्यक्रम होणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले. मोदी यापूर्वी २०१९ च्या निवडणुकीनंतर केदारनाथला गेले होते. २०१४ मध्ये ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या प्रतापगडला गेले होते. दुसरीकडे, काँग्रेस नेते राहुल गांधीही लोकसभा प्रचार संपल्यावर विपश्यना करण्यासाठी दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे.

SCROLL FOR NEXT