दिल्ली मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचे कारण सीबीआयने शनिवारी सांगितले.  FIle Photo
राष्ट्रीय

Arvind Kejriwal News | केजरीवाल ईडी प्रकरणात सुटले, मात्र CBI मध्ये अडकले

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी अंतरिम जामीन मंजूर केला. दिल्ली मद्य धोरण घोटाळा ईडी प्रकरणात केजरीवलांना मोठा दिलासा मिळाला. मात्र सीबीआय तपास करत असलेल्या कथित अबकारी धोरण घोटाळ्याशी संबंधित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात मात्र त्यांचा जामीनाचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे.

केजरीवालांची CBI प्रकरणातील कोठडी वाढवली

दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात आज (दि.१२ जुलै) राऊस एव्हेन्यू कोर्टात सीबीआय प्रकरणात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची सीबीआय प्रकरणात न्यायालयीन कोठडी गुरूवार २५ जुलैपर्यंत वाढवली आहे, असे वृत्त एएनआयने दिले आहे.

'मुख्यमंत्री केजरीवाल कोठडीतच राहणार'

"सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे आणि कलम १९ चा मुद्दा आणि त्यांच्या अटकेची गरज आहे का? यासाठी हे प्रकरण मोठ्या पीठाकडे पाठवण्यात आले आहे. सीबीआय प्रकरणात त्यांचा जामीन अद्याप प्रलंबित असल्याने मुख्यमंत्री केजरीवाल कोठडीतच राहतील. पण सर्वोच्च न्यायालयाकडून त्यांना अंतरिम जामीन मिळणे हा हा मोठा विजय आहे. .." अशी माहिती केजरीवाल यांचे वकील ऋषिकेश कुमार यांनी दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT