राष्ट्रीय

Arvind Kejriwal News : केजरीवाल म्हणाले, ‘परवा मी आत्मसमर्पण करेन…

Sonali Jadhav

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्लीचे मुख्यमंत्री, आप नेते अरंविद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेत सांगितले की, "सर्वोच्च न्यायालयाने मला २१ दिवसांची मुदत दिली होती. उद्या (दि.१) २१ दिवस पूर्ण होत आहेत. परवा (रविवार, दि.२) मला शरणागती पत्करावी लागणार आहे. मी तिहार तुरुंगात जाईन, मला माहित नाही की ते मला तिहार तुरुंगात किती काळ ठेवतील. पण माझे मन मोठे आहे. देशाला हुकूमशाहीपासून वाचवण्यासाठी मी तुरुंगात जाणार आहे." Arvind Kejriwal News

काय म्हणाले केजरीवाल? 

  • रविवार (दि.२) रोजी मी आत्मसमर्पण करेन.
  • तुरुंगात असताना माझ्यावर अत्याचार झाले.
  • देशाला वाचवण्यासाठी मला काही झाले, माझा जीव गेला तरी दुःखी होऊ नका.

तुरुंगात असताना माझ्यावर अनेक प्रकारे अत्याचार झाले…

अरविंद केजरीवाल पत्रकार परिषदेत म्हणाले, "इन्सुलिनची इंजेक्शन दिवसातून चार वेळा दिले जाते." तुरुंगात त्यांनी अनेक दिवस माझे इंजेक्शन बंद केले, माझी साखर ३००-३२५ पर्यंत पोहोचली होती. इतके दिवस साखर जास्त राहिली तर किडनी आणि यकृत खराब होते. त्यांना काय हवं होतं, त्यांनी असं का केलं ते माहीत नाही." तुरुंगात ५० दिवसांतच वजन कमी झाले. वजन ७४ किलोवरून ६४ किलो झाले आहे, असेही ते म्हणाले. डॉक्टरांनी याला मोठ्या आजाराचे लक्षण म्हटले आहे. २ जूनला मी तिहार तुरुंगात परत जाईन. या वेळी मी किती काळ तुरुंगात राहीन हे मला माहीत नाही, पण माझे मनोबल उंचावले आहे. तुरुंगात असताना माझ्यावर अनेक प्रकारे अत्याचार झाले आहेत, असेही ते म्हणाले.

मी आत्मसमर्पण करेन…

परवा मी आत्मसमर्पण करेन, असे सीएम केजरीवाल म्हणाले. त्यासाठी दुपारी तीनच्या सुमारास मी माझ्या घरातून बाहेर पडेन. कदाचित यावेळी ते मला आणखी छळतील. पण मी झुकणार नाही. तुम्ही तुमची काळजी घ्या, तुरुंगात मला तुमची खूप काळजी वाटते. तुम्ही आनंदी असाल तर तुमचे केजरीवालही खुश होतील. अर्थात मी तुमच्यामध्ये नसेन, पण काळजी करू नका. तुमचे सर्व काम चालूच राहील, मी कुठेही असलो, आत असो वा बाहेर, मी दिल्लीचे काम थांबू देणार नाही.

सर्व मिळून हुकूमशाहीशी लढत आहोत…

केजरीवाल म्हणाले, "प्रार्थनेत मोठी शक्ती आहे." जर तुम्ही माझ्या आईसाठी दररोज प्रार्थना केली तर ती नक्कीच निरोगी राहील. माझी पत्नी सुनीता खूप खंबीर आहे, तिने आयुष्यातील प्रत्येक कठीण क्षणी मला साथ दिली आहे. जेव्हा कठीण प्रसंग येतो तेव्हा संपूर्ण कुटुंब एकत्र येते. आपण सर्व मिळून हुकूमशाहीशी लढत आहोत. अरविंद केजरीवाल असेही म्हणाले की, देशाला वाचवण्यासाठी मला काही झाले, माझा जीव गेला तरी दुःखी होऊ नका. तुमच्या प्रार्थनेमुळे मी आज जिवंत आहे आणि तुमचे आशीर्वाद भविष्यातही माझे रक्षण करतील. शेवटी मी एवढेच सांगू इच्छितो की, तुमचा मुलगा लवकरच परत येईल

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT