स्मृती इराणी File Photo
राष्ट्रीय

जम्मू काश्मीरमध्ये कलम ३७० कधीही पुनर्संचयित होणार नाही: स्मृती इराणी

Article 370 News|जम्मू-काश्मीर विधानसभेत कलम ३७० वरुन गदारोळ

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर विधानसभेत कलम ३७० वरून झालेल्या गदारोळावरून माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्सवर जोरदार हल्ला चढवला. कलम ३७० कधीही पुनर्संचयित होणार नाही, भारताचे विभाजन करण्याचा राज्यातील सत्ताधारी लोकांचा प्रयत्न यशस्वी होणार नाही. लोकशाही मार्गाने निवडून आलेले सरकार विकासाच्या मुद्यांवर काम करण्याऐवजी, भारताला एकसंध करण्याऐवजी फाळणीचा दाखला देत असल्याचा घणाघात इराणी यांनी केला.

दिल्लीत पत्रकार परिषदेला संबोधित करताना स्मृती इराणी म्हणाल्या की, इंडिया आघाडीने जम्मू काश्मीरमध्ये बुधवारी मंजूर केलेल्या ठरावानुसार ते जम्मू आणि काश्मीरमध्ये भारतीय संविधानाविरूद्ध नवीन युद्ध लढत आहेत असे दिसते. देशात सर्वाना मान्य असलेल्या संसद आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांचा अवमान करण्याचा आणि अवमान करण्याचा अधिकार इंडिया आघाडीतील काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सला कोणी दिला, असा प्रश्नही त्यांनी विचारला.

स्मृती इराणी म्हणाल्या की, भारतातील प्रत्येक नागरिकाला हे माहित आहे की कलम ३७० हटवल्यानंतर नागरिकांच्या मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. दहशतवादी घटनांमध्ये ७० टक्के घट झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT