राष्ट्रीय

आम्हालाही अटक करा! राहुल गांधी, प्रियंका गांधी-वाड्रा यांची सरकारवर टीका

Pudhari News

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा; कोरोनाची लस परदेशात पाठविण्याबाबत प्रश्न उपस्थित केलेल्या पोस्टरवरून कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी उघडपणे सरकारला आव्हान दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणार्‍या पोस्टरमुळे शनिवारी दिल्लीत १७ एफआयआर नोंदवून १५ जणांना अटक करण्यात आली होती. तेच पोस्टर कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी-वाड्रा यांनीही शेअर केले आहे. 

अधिक वाचा : काॅंग्रेसचा धुरंदर राजकारणी राजीव सातव! जाणून घ्या त्यांच्या राजकीय प्रवासाविषयी…

सोशलमिडीयावरून पोस्टर शेअर करताना राहुल गांधी म्हणाले की, 'मलाही अटक करा.' एवढेच नाही तर कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी ट्विटरवर आपले प्रोफाइल पिक्चर बदलून त्याजागी हे पोस्टर लावले आहे. 'मोदीजी, आमच्या मुलांची लस परदेशात का पाठविली गेली?' अशी पोस्टर लावणाऱ्या १५ जणांना शनिवारी दिल्ली पोलिसांनी अटक केली.

अधिक वाचा : कोरोना पॉझिटिव्हीटी दर १७ टक्क्यांच्या खाली

यानंतर सर्व जिल्ह्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना सतर्क करण्यात आले केले. त्यानंतर मिळालेल्या तक्रारींच्या आधारे अनेक जिल्ह्यांमध्ये सरकारी आदेशांचे उल्लंघन आणि सार्वजनिक मालमत्ता अधिनियम प्रतिबंधक कलमांतर्गत १७ गुन्हे दाखल करण्यात आले. दिल्लीतील शाहदरा, रोहिणी, रिठाला, द्वारका आणि इतर अनेक ठिकाणी ही पोस्टर्स आढळली होती. 

अधिक वाचा : झुंज ठरली अपयशी! राजीव सातव यांचे निधन

१३ मे पर्यंत सर्व पोस्टर्स काढली गेली. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, कोणाच्या सांगण्यावरून हे पोस्टर्स शहरभर लावण्यात आले होते याची तपासणी केली जात आहे. त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल. आता राहुल गांधी व प्रियंका गांधी यांचे समर्थनही अशी पोस्टरबाजी करणाऱ्या लोकांना मिळाले आहे. त्यांनीही असे पोस्टर शेअर करत आम्हालाही अटक करा अशी मागणी केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT