ISI-linked arms racket busted: दिल्ली पोलिसांनी पाकिस्तानचा आणखी एक मोठा कट उधळून लावला आहे. गुन्हे शाखेने पाकिस्तानच्या आयएसआयशी संबंधित एका मोठ्या आंतरराष्ट्रीय शस्त्र तस्करी टोळीचा पर्दाफाश केला असून, पाकिस्तानातून भारतात पाठवण्यात आलेला अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा मोठा साठा जप्त केला आहे.
पाकिस्तानमधून अत्याधुनिक शस्त्रे ड्रोनद्वारे पंजाबमध्ये पाठवण्यात आली होती. कुख्यात गुंडांना शस्त्रे पुरवणाऱ्या चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानातून दिल्ली NCR मध्ये पाठवण्यात आलेल्या शस्त्रास्त्रांचा हा साठा लॉरेन्स बिश्नोई, बंबीहा, गोगी हिमांशू भाऊ टोळीला पुरवण्यात येणार होता. ही शस्त्रे लॉरेन्स बिश्नोई, बंबीहा, गोगी आणि हिमांशू भाऊ टोळ्यांना पुरवली जाणार होती, असेही पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. आरोपींकडून १० महागड्या परदेशी पिस्तूल आणि ९२ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ही शस्त्रे दिल्ली आणि आसपासच्या राज्यांमधील गुन्हेगारांना आणि गुंडांना पुरवली जात होती.
हे संपूर्ण नेटवर्क पाकिस्तानच्या आयएसआयशी संबंधित व्यक्तींच्या इशाऱ्यावर कार्यरत होते. शस्त्रे प्रथम पाकिस्तानात नेली जात होती, नंतर भारतात तस्करी केली जात होती. या व्यक्तींनी आतापर्यंत भारतात किती शस्त्रे विकली आहेत आणि कोणत्या टोळ्यांना किंवा व्यक्तींना ही शस्त्रे मिळाली आहेत, याचा तपास पोलिस आता करत आहेत. तपास यंत्रणा उर्वरित टोळी सदस्यांचा आणि मोबाईल फोन, बँक तपशील आणि सोशल मीडिया वापरून त्यांच्या लिंक्सचा देखील तपास करत आहेत.