राष्ट्रीय

पीएम मोदींची लसीसाठी अमेरिकेत फोनाफोनी!

Pudhari News

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

देशात लसीकरणाची घोषणा करण्यात आली असली, तरी लसीचा अनेक केंद्रावर ठणठण गोपाळ असल्याने परिस्थिती भीषण झाली आहे. देशात सुरु असलेल्या कोरोना लसीच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. 

अधिक वाचा : आदर्श भाडे कायद्यास मंजुरी! तर दोन महिन्यांचे भाडे दुप्पट आणि त्यानंतर होऊ शकते चार पट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्याशी फोनवरून चर्चा केली. कोरोना व्हायरस लस जागतिक स्तरावर शेअर करण्याच्या अमेरिकेच्या रणनीतीचा एक भाग म्हणून भारताला लस पुरवण्याबाबत देण्यात आलेल्या आश्वासनाचे पंतप्रधान मोदींनी कौतुक केले. अमेरिकन सरकार, व्यापारी आणि प्रवासी भारतीयांकडून मिळालेले सहकार्य, एकता यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कमला हॅरिस यांचे आभार मानले.

अधिक वाचा : 'लसीकरणाबाबत काँग्रेसची तर 'वन टू का फोर' पॉलिसी'

मिळालेल्या माहितीनुसार कमला हॅरिस यांनी पंतप्रधान मोदींना अमेरिकेच्या लस धोरणाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की अमेरिका लस शेअर धोरणांतर्गत भारतासह अनेक देशांना लस देईल. पंतप्रधान मोदींनी या मुद्यावर अमेरिकी सरकारच्या निर्णयाचे कौतुक केले.

अधिक वाचा : राहुल गांधींनी ट्विटरवर अनेक नेत्यांना का केले अनफॉलो?

अमेरिकेतील सरकार, व्यवसाय आणि अमेरिकेतील भारतीय डायस्पोराकडून अलिकडच्या काळात भारताला मिळालेल्या इतर सर्व सहकार्या व एकताबद्दल मोदींनी कौतुक केले. कमला हॅरिसशी झालेल्या चर्चेदरम्यान पंतप्रधान मोदींनी अशी अपेक्षा बाळगली की परिस्थिती सामान्य झाल्यावर लवकरच त्यांनी भारत दौरा करावा.

SCROLL FOR NEXT