पुढारी ऑनलाईन डेस्क - पंजाबी गायक AP Dhillon च्या घरी गोळीबार करणारा एक जण कॅनडामध्ये सापडला. त्याला पोलिसांनी अटक केली असून याच प्रकरणातील त्याचा दुसरा साथीदार फरार झाल्याची शंका व्यक्त करण्यात आली आहे.
पंजाबी गायक एपी ढिल्लो (AP Dhillon) आपल्या गाण्यांच्या माध्यमातून लाखों कोटी लोकांवर रुंजी घालतो. दरम्यान, एक वृत्त समोर आले होते की, सप्टेंबरमध्ये त्याच्या कॅनडा येथील घराबाहेर गोळीबार झाला होता. त्या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या हल्ल्यानंतर पोलिस तपास करत होते. आता या प्रकरणी कॅनडाच्या पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. तर त्याचा दुसरा साथीदार फरार असल्याचे सांगितले जात आहे.
इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, कॅनडाच्या पोलिसांनी म्हटलं आहे. ३० ऑक्टोबर, २०२४ रोजी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. एका घरात बेजबाबदारपणे बंदूक चालवणे आणि सप्टेंबरमध्ये कॉलवूडच्या रेवेनवुड रोडवर ३३०० ब्लॉकमध्ये दोन वाहनांमध्ये आग लावल्याचा आरोप त्याच्यावर आहे. ही घटना सप्टेंबर, २०२४ ला झाली होती.
एपी ढिल्लोला 'ब्राउन मुंडे', 'एक्सक्यूज', 'समर हाय', 'विय़ यू', 'दिल नू', 'इनसेन' यासारख्या पंजाबी गाण्यांसाठी ओळखलं जातं.
पंजाबी गायक भारतात अनेक कॉन्सर्ट करणार आहे. दिल्लीमध्ये तो कॉन्सर्ट करणार होता. पण, असं म्हटलं जात आहे की दिल्ली कॉन्सर्ट रद्द होऊ शकतं. पण याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही.