राष्ट्रीय

‘लसीकरणाबाबत काँग्रेसची तर ‘वन टू का फोर’ पॉलिसी’

Pudhari News

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी काँग्रेस शासित प्रदेशात लसींचा काळाबाजार सुरु असल्याची टीका केली. त्यांनी केंद्राने कोरोनावरील लस निर्मिती करणाऱ्या कंपनींकडून लसीचे डोस खरेदी केले आहेत. त्यानंतर तो राज्यांना ४०० रुपयांना विकला. पण, पंजाब सरकार ते लसींचे डोस शासगी रुग्णालयांना १ हजार ६० रुपयांना विकत आहे. ही खासगी रुग्णालये नागरिकांना हाच एक डोस १ हजार ५६० रुपयांना विकत आहे असा आरोप केला. 

वाचा : कॉनवेने गांगुलीचे लॉर्ड्सवरील २५ वर्षापूर्वीचे मोडले रेकॉर्ड

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकून यांनी आज ( दि. ३ ) पंजाब आणि राजस्थान या काँग्रेसशासित राज्यांवर लसींचा काळाबाजार केल्याचा आरोप केला. त्यांनी या राज्यातील दोन मुख्यमंत्री हे गांधी घराण्याचे आवडते आहेत. तेच या भ्रष्टाचाराच्या मागे आहेत.

वाचा : राहुल गांधींनी ट्विटरवर अनेक नेत्यांना का केले अनफॉलो?

अनुराग ठाकूर यांनी 'आतापर्यंत जी लस मोफत दिली जात होती. ती आता ३ हजार १२० रुपयांना मिळत आहे. काँग्रेसची ही आवडती 'वन टू का फोर' पॉलिसी आहे.' असे ट्विट केले. राजस्थान सरकार हे पंजाब सरकारच्या दोन पावले पुढे आहे असे ठाकूर म्हणाले. त्यांनी सरकारने ११.५० लाख कोरोना लसीचे डोस वाया घालवले असल्याचा आरोप केला. ते म्हणाले 'हजारो लसींचे डोस हे कचऱ्याच्या डब्ब्यात सापडले आहेत. असे करून काँग्रेसने लोकांचा विश्वास कचऱ्याच्या डब्यात फेकला आहे.'

कोरोना लसीकरणावरुन केंद्र सरकार आणि बिगर भाजपशासित राज्य सरकारे यांच्यात संघर्ष होत आहे. जानेवारीपासून हा संघर्ष प्रकर्षाने जाणवत आहे. याच दरम्यान, बिगर भाजपशासित काही राज्यांनी लसींच्या अपुऱ्या परवठ्यावरुन टीका केली होती. आता केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी झारखंड आणि छत्तीसगड या राज्यांनी सर्वात जास्त लसींचे डोस वाया घालवले असल्याची टीका केली. यावर राज्यांनी ही माहिती पूर्ण तथ्यांवर आधारीत नाही असे म्हणत हे आरोप फेटाळले. 

SCROLL FOR NEXT