नवी दिल्ली; वृत्तसंस्था : ‘फुले’ चित्रपटाचे निर्माते अनुराग कश्यप यांच्या कुटुंबीयांना आणि मित्रांना हत्या आणि बलात्काराच्या धमक्या मिळत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
शुक्रवारी संध्याकाळी 52 वर्षीय कश्यप यांनी इन्स्टाग्रामवर एक निवेदन पोस्ट करत सांगितले की, त्यांची टिप्पणी काढून घेतली गेली आहे. ही माझी माफी आहे, माझ्या पोस्टसाठी नाही; पण त्या एका ओळीसाठी जी संदर्भातून काढली गेली आणि त्यामुळे वाढणारी द्वेषभावना. कोणत्याही कृती किंवा भाषणामुळे तुमच्या मुलीला, कुटुंबीयांना, मित्रांना आणि सहकार्यांना बलात्कार आणि हत्येच्या धमक्या मिळणं योग्य नाही, कश्यप म्हणाले.