राष्ट्रीय

PM Modi on CJI Gavai : सरन्यायाधीशांवरील हल्ला म्हणजे संविधानावर घाला! पंतप्रधान मोदींकडून CJI गवई यांच्या संयमाचे कौतुक

रणजित गायकवाड

नवी दिल्ली : नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताचे सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावरील निंदनीय हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला. या घटनेनंतर पंतप्रधान मोदी यांनी न्यायमूर्ती गवई यांच्याशी संवाद साधला आणि प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी दाखवलेल्या शांततेचे आणि संयमाचे कौतुक केले.

सरन्यायाधीश, गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याने प्रत्येक भारतीयाला संताप आला आहे. आपल्या समाजात अशा निंदनीय कृत्यांना स्थान नाही. ते पूर्णपणे निषेधार्ह आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना म्हटले की, ‘मी भारताचे सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्याशी बोललो. आज सकाळी सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे प्रत्येक भारतीयाच्या मनात संताप निर्माण झाला आहे. अशा निंदनीय कृत्यांना आपल्या समाजात कोणतेही स्थान नाही. हे कृत्य अत्यंत निषेधार्ह आहे.’

पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सरन्याधीश गवई यांनी अशा कठीण परिस्थितीत दाखवलेल्या शांततेचे आणि संयमाचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले, ‘या परिस्थितीचा सामना करताना सरन्याधीश गवई यांनी दाखवलेल्या शांत वृत्तीची मी प्रशंसा करतो. हे त्यांच्या न्यायाच्या मूल्यांप्रति असलेल्या बांधिलकीला आणि आपल्या संविधानाच्या आत्म्याला अधिक बळकट करण्याच्या त्यांच्या भूमिकेला अधोरेखित करते.’

देशाच्या सर्वोच्च न्यायाधीशांवर झालेल्या या हल्ल्याच्या घटनेने संपूर्ण न्यायव्यवस्थेची सुरक्षा आणि सन्मान याबद्दल गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत. या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT