'Service has no age': Anand Mahindra praises 88-year-old Inderjit Singh Sidhu's work!
नवी दिल्ली : प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी केलेली एक एक्स पोस्ट चर्चेत आली आहे. ही पोस्ट चंदीगडमधील असून यामध्ये एक ८८ वर्षाचे वृद्ध रिटार्यड पोलिस अधिकारी स्वच्छता करत असताना दिसत आहेत. ही कहाणी आहे चंदीगडच्या सेक्टर ४९ मधील ८८ वर्षीय इंदर जीत सिंग सिद्धू यांची ते सकाळी ६ वाजता आपल्या दिवसाची सुरवात सेवाभावाने करतात. सकाळी लककर ते चंदीगडमधील रस्त्यांवर स्वच्छता करण्यास सुरवात करतात. दररोज सकाळी न चुकता ६ वाजता ते आपल्या कामाला सुरवात करतात.
इंदरजीज सिद्धू यांचे वय झाले असूनही एका सायकल गाडीच्या मदतीन अत्यंत शांततेत आणि निःस्वार्थ भावनेने, ते रस्त्यांवर पडलेला कचरा उचलतात. त्यांनी कोणतीही नोकरी किंवा पद नसतानाही ही जबाबदारी स्वतःहून घेतली आहे. यापाठीमागे एक कारण आहे ते म्हणजे चंदीगड शहर स्वच्छतेच्या बाबतीत मागे आहे. आणि केंद्र शासनाने केलेल्या स्वच्छ शहर सर्वेक्षणात कमी क्रमांकावर आहे ही बाब त्यांना खटकली व त्यांनी कोणाचीही मदत न घेता. आपले स्वच्छतेचे काम सुरु ठेवले आहे.
पुढे महिंद्रा यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. की इंदरजीत यांनी कोणविषयीही तक्रार न करता थेट स्वच्छतेचे काम करण्यास सुरुवात केली. ते केवळ कचरा साफ करतात असेही नाही तर त्यांच्या कृतीतून एक संदेश देत आहेत. "उमेद आणि उद्देश वयाच्या जोखडात अडकत नाहीत." असेही मंहिद्रा यांनी इंदरजीत यांच्या कार्याचे कौतूक केले आहे.
आजच्या वेगवान तरुण जगात इंदरजीत यांची ही सातत्यपूर्ण पावले हे सांगतात उद्देश कधीही निवृत्त होत नाही सेवेला वयाचे बंधन नसते. ‘ रस्त्यावरील या शांत योद्ध्याला सलाम !’ असे म्हणत त्यांनी इंदरजीत यांच्या कतृत्वाला सलाम केला आहे.