'मला माझ्या पत्नीकडे पाहणे आवडते', आनंद महिंद्रांनी एल अँड टी कंपनीच्या सीईओंना लगावला टोला  File Photo
राष्ट्रीय

'मला माझ्या पत्नीकडे पाहणे आवडते', आनंद महिंद्रांनी एल अँड टी कंपनीच्या सीईओंना लगावला टोला

'कामाच्या तासांपेक्षा गुणवत्ता अधिक महत्‍वाची'

निलेश पोतदार

पुढारी ऑनलाईन : महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी एका कार्यक्रमात कामाच्या गुणवत्तेवर लक्ष देण्यावर भर दिला. त्‍यांनी म्‍हटले की, कामाच्या गुणवत्तेवर भर द्या, त्‍याच्या प्रमाणावर नाही. कारण १० तासांत जग बदलू शकते. त्‍यांनी हे विधान दिल्‍लीत आयोजित राष्‍ट्रीय युवा महोत्‍सवात केले. जेंव्हा त्‍यांना लार्सन अँन्ड टुब्रो (एल अँड टी) एल ॲंड टी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक एसएन सुब्रह्मण्यम यांनी आठवड्यात ९० तास काम करण्याच्या विधानावर विचारले गेले. तेंव्हा महिंद्रा यांनी वरील उत्‍तर दिले. गेल्‍या वर्षी इंन्फोसिसचे सह-संस्‍थापक नारायण मुर्ती यांनीही युवकांनी आठवड्यातून ७० तास काम केले पाहिजे असे विधान केले होते. तेंव्हा या विधानावरूनही मोठी चर्चा झाली होती. (anand mahindra)

खरंतर, एस. एन. सुब्रमण्यम यांनी काही दिवसांपूर्वी टिप्पणी केली होती की, कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून ९० तास काम करावे. रविवारीही सुट्टी घ्‍यायला नको पाहिजे. या विधानावरून सोशल मीडियावर मोठा वाद सुरू झाला. त्‍यांचे म्‍हणणे होते तुम्‍ही तुमच्या बायकोला किती वेळ पाहत राहणार. या विधानावर अनेक लोक नाराज झाले. तथापी, आनंद महिंद्रा यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की या चर्चेचा केंद्रबिंदू फक्त कामाच्या प्रमाणात आहे, तर खरा मुद्दा कामाच्या गुणवत्तेचा आहे.

''कामाची गुणवत्ता अधिक महत्‍वाची''

त्‍यांनी म्‍हंटले, माझे म्‍हणणे असे आहे की, कामाच्या प्रमाणापेक्षा गुणवत्तेवर अधिक लक्ष दिला पाहिजे. नाही की, तुम्‍ही ४० तास, ७० तास किंवा ९० तास काम करा. तुम्‍ही जर १० तासात जग बदलू शकत असाल तर ते महत्‍वाचे आहे. कामाची गुणवत्ता सर्वात महत्‍वाची आहे. महिंद्रा म्‍हणाले, माझे असे नेहमी म्‍हणणे असते की, कंपनीत अशी माणसे हवीत जी हुशारीने निर्णय घेतात. त्यांनी असाही भर दिला की अशी बुद्धी असली पाहिजे जी समग्र पद्धतीने विचार करते आणि जगभरातून येणाऱ्या सूचनांसाठी खुली असते.

कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवण्यावर भर

त्यांनी एक उदाहरण दिले आणि सांगितले की, अभियंते आणि एमबीए सारखी पार्श्वभूमी असलेल्या लोकांनी कला आणि संस्कृतीचा अभ्यास केला पाहिजे जेणेकरून ते चांगले निर्णय घेऊ शकतील. कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवण्याची गरज अधोरेखित करताना महिंद्रा म्हणाले, “जर तुम्ही घरी वेळ घालवत नसाल, मित्रांसोबत वेळ घालवत नसाल, जर तुम्ही वाचन करत नसाल, जर तुम्हाला चिंतन करण्यासाठी वेळ मिळत नसेल, तर तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवू शकत नाही. जर विचार करायला वेळ नसेल, तर निर्णय घेताना योग्य सूचना कशा आणाल?"

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT