नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन
लेह, लडाख येथे आज (बुधवार) सकाळी 08:12 वाजता ४.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. राष्ट्रीय भूकंपविज्ञान केंद्राने याची माहिती दिली.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) नुसार बुधवारी सकाळी लडाखमधील लेहमध्ये ४.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. अक्षांश 36.10 उत्तर आणि रेखांश 74.81 पूर्व येथे केंद्रबिंदू असलेला हा भूकंप सकाळी 8:12 वाजता 150 किलोमीटर खोलीवर आला असून आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. गेल्या महिन्यात, आसाममध्ये 3.2 तीव्रतेचा भूकंप झाला होता, त्याचे केंद्र 25 किलोमीटरच्या खोलीवर कार्बी आंगलाँग जिल्ह्यात होते.