प्रतीकात्मक छायाचित्र. File Photo
राष्ट्रीय

HC petition dismissed | 'रामचरितमानस चौपाई'चा अर्थ स्‍पष्‍ट करत हायकोर्टाने फेटाळली याचिका, नेमकं काय होतं प्रकरण?

याचिकेत उल्‍लेख केलेल्‍या श्लोकावर 'स्पष्टीकरण देता न आलेल्‍या वकिलास सुनावले खडेबोल

पुढारी वृत्तसेवा

High Court petition dismissed

लखनौ : अलाहाबाद उच्च न्यायालयाच्‍या लखनौ खंडपीठ १६ ​​व्या शतकातील भारतीय कवी गोस्वामी तुलसीदास यांच्या अवधी भाषेतील महाकाव्य 'श्री रामचरितमानस'मधील एका चौपाईचा अर्थ एका वकिलासाठी स्पष्ट करत याचिका फेटाळली. न्यायमूर्ती सुभाष विद्यार्थी यांच्या खंडपीठाने, श्लोकाचा खरा संदर्भ न समजून घेता त्यावर अवलंबून राहण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकिलास खडेबोलही सुनावले.

याचिकेत विलंबाचे स्पष्टीकरणच नाही मग का स्वीकारली जावी?

'लाईव्‍ह लॉ'च्‍या रिपोर्टनुसार, अवनींद्र कुमार गुप्ता यांनी दाखल केलेल्या रिट याचिकेत राज्य माहिती आयोगाने (SIC) दिलेल्या आदेशाला आव्हान दिले होते. या आदेशात, अर्जदाराने इच्छित माहिती मिळाल्याचे विधान नोंदवल्यानंतर त्याचे अपील फेटाळण्यात आले होते. याबाबत रिट याचिका गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये दाखल करण्यात आली होती; तथापि, सुमारे २ वर्षे आणि १० महिन्यांच्या विलंबाचे स्पष्टीकरण याचिकेत देण्यात आले नव्हते. जेव्हा खंडपीठाने त्याच्या वकिलाला विचारले की, याचिकेत विलंबाचे स्पष्टीकरण दिलेले नसताना ती का स्वीकारली जावी, असा सवालही खंडपीठाने केला.

श्री रामचरितमानसमधील चौपाईवर म्‍हणणे मांडण्‍यास सांगितले

वकिलाने सांगितले की, कलम २२६ अंतर्गत कार्यवाहीला मुदत कायद्याचे (लिमिटेशन ॲक्ट) नियम लागू होत नाहीत.विशेष म्हणजे, त्याच्या वकिलाने जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्या भाषणाचा संदर्भ दिला आणि पुढे श्री रामचरितमानसमधील खालील चौपाई उद्धृत केली:

समरथ कहुँ नहिं दोषु गोसाईं। रबि पावक सुरसरि की नाईं॥

तथापि, जेव्हा न्यायमूर्ती विद्यार्थी यांनी त्याला त्या चौपाईवर आधारित आपले म्हणणे सविस्तरपणे मांडण्यास आणि ती कोणी, कोणाला आणि कोणत्या संदर्भात म्हटली आहे हे 'स्पष्ट' करण्यास सांगितले, तेव्हा वकिलाने सांगितले की त्याला त्याबद्दल माहिती नाही.

वकिलास सुनावले खडेबोल

याची गंभीर दखल घेत न्यायमूर्ती विद्यार्थी यांनी निरीक्षण नोंदवले की, "जेव्हा एखादा वकील कोणत्याही पुस्तकातील कोणत्याही मजकुराचा संदर्भ देतो, तेव्हा त्याने स्वतः त्याचा खरा अर्थ समजून घेतल्यानंतरच असे केले पाहिजे. स्वामी प्रसाद मौर्य विरुद्ध उत्तर प्रदेश राज्य (२०२३ LiveLaw (AB) ४२०) या खटल्यातील स्वतःच्याच निकालाचा संदर्भही यावेळी न्‍यायालयाने दिला. यामध्‍ये निरीक्षण नोंदवले होते की, पुस्तकांमधील उतारे ज्या संदर्भात ते म्हटले गेले आहेत, त्यापासून "वेगळे करून" मांडले जाऊ नयेत.

चौपाईचा अर्थही सांगितला...

विशेष म्हणजे, न्यायमूर्ती विद्यार्थी यांनी त्या श्लोकाचे स्पष्टीकरण देताना नमूद केले की, या चौपाईमध्ये महर्षी नारदांनी आपली कन्या पार्वतीच्या जन्मानंतर लगेचच हिमालयाला जे सांगितले होते, त्याचे चित्रण आहे. नारदांनी भविष्यवाणी केली होती की पार्वतीच्या पतीला आई-वडील नसतील, तो एक योगी असेल आणि विचित्र वस्त्रे परिधान करेल. नारदांनी स्पष्ट केले की हे सर्व गुण भगवान शिवामध्ये आहेत आणि ते त्यांचे गुण मानले जातात, असेही न्यायालयाने नमूद केले.

न्यायमूर्ती विद्यार्थी यांनी श्लोकात वापरलेल्या रूपकांचेही दिले स्पष्टीकरण

"जो कोणी काहीही करण्यास सक्षम असतो, त्याला दोष दिला जात नाही, जसे की भगवान विष्णू शेषनागावर (सापावर) विराजमान असतात; परंतु सुज्ञ लोक या कारणास्तव त्यांना दोष देत नाहीत; सूर्य आणि अग्नी त्यांच्या संपर्कात येणारी प्रत्येक चांगली किंवा वाईट वस्तू जाळून टाकतात, परंतु त्यासाठी त्यांना दोष दिला जात नाही; सर्व प्रकारचे पाणी गंगा नदीत मिसळते आणि वाहते, परंतु कोणीही तिला दोष देत नाही". न्यायालयाने पुढे असा निष्कर्ष काढला की, त्या श्लोकाचा "सध्याच्या प्रकरणाच्या तथ्यांशी काहीही संबंध नाही".

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT