Al Falah bomb blast connection | 2008 च्या बॉम्बस्फोटांमध्ये अल-फलाहचे कनेक्शन उघड 
राष्ट्रीय

Al Falah bomb blast connection | 2008 च्या बॉम्बस्फोटांमध्ये अल-फलाहचे कनेक्शन उघड

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : लाल किल्ला बॉम्बस्फोट आणि व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूल प्रकरणात चौकशीच्या फेर्‍यात आलेल्या फरीदाबादमधील धौज येथील अल-फलाह विद्यापीठाचे दहशतवादी हस्तकांशी जुने संबंध असल्याचे तपासातून पुढे आले आहे.

अल-फलाहच्या अधिकार्‍यांनी सुरू असलेल्या तपासावर भाष्य करण्यास नकार दिला. 2008 मधील साखळी बॉम्बस्फोटांप्रकरणी वाँटेड असलेला इंडियन मुजाहिदीनचा फरार दहशतवादी मिर्झा शादाब बेग हा फरीदाबादस्थित या विद्यापीठाचा माजी विद्यार्थी होता, असे वृत्त आहे. इंडियन मुजाहिद्दीनचा प्रमुख हस्तक असलेल्या बेगवर 2008 च्या जयपूर साखळी बॉम्बस्फोट, अहमदाबाद-सुरत बॉम्बस्फोट आणि 2007 च्या गोरखपूर स्फोटांचा आरोप आहे. तपास यंत्रणांनी सांगितले आहे की, आझमगडमधील राजा का किला मोहल्ला येथील मूळ रहिवासी असलेला बेग सौदी अरेबियामध्ये राहात आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार 2019 मध्ये तो अखेरचा अफगाणिस्तानात आढळून आला होता.

आयएमच्या दहशतवाद्यांकडे लक्ष

लाल किल्ल्याजवळील स्फोटाने या बेपत्ता आयएम दहशतवाद्याकडे पुन्हा लक्ष वेधले गेले आहे. कारण तपासकर्त्यांना त्याच्यात आणि दिल्ली लाल किल्ला बॉम्बस्फोट प्रकरणात नवीन दुवे सापडले आहेत. सुमारे दोन दशकांच्या अंतराने घडलेल्या या दोन घटनांमधील संबंध नाकारता येत नाही, असे वरिष्ठ अधिकार्‍यांनी म्हटले आहे.

अल-फलाहच्या संस्थापकाच्या वडिलोपार्जित घरावर तोड कारवाईचे संकट

मनी लाँडरिंगप्रकरणी तपास यंत्रणांच्या चौकशीला सामोरे जात असलेले अल-फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद अहमद सिद्दीकी यांच्या वडिलोपार्जित घरालाही प्रशासनाने पाडण्याची नोटीस बजावली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT