Nupur Sharma controversy
भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांच्या विरोधात प्रक्षोभक घोषणा दिल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अजमेर शरीफ दर्ग्याच्या खादिम गौहर चिश्तीची आज स्थानिक न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. File Photo
राष्ट्रीय

नुपूर शर्मांविरोधात प्रक्षोभक घोषणा : अजमेर दर्ग्याच्या मौलवींची निर्दोष मुक्तता

पुढारी वृत्तसेवा

भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांच्या विरोधात प्रक्षोभक घोषणा दिल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अजमेर शरीफ दर्ग्याच्या खादिम गौहर चिश्तीची आज (दि.१६) स्थानिक न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. तसेच याच खटल्यातील अन्य सहा आरोपींचीही न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. ( Nupur Sharma controversy)

जून 2022 मध्ये, एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्‍ये गौहर चिश्ती आणि इतर अजमेर दर्ग्याच्या मुख्य प्रवेशव्‍दारावर नुपूर शर्माच्या विरोधात प्रक्षोभक घोषणा देताना दिसले होते.( Nupur Sharma provocative remarks case)

नुपूर शर्मा यांनी वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान मुस्‍लिम धर्मांबाबत अपमानास्पद वक्तव्य केले हाेते. त्‍यानंतर त्‍या वादाचा केंद्रबिंदू बनल्‍या. शर्मा यांना भाजपने पक्षातून निलंबित केले होते. वादग्रस्‍त वक्तव्यावरून अनेकांकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्याची तक्रारही त्‍यावेळी नुपूर शर्मा यांनी केली होती. याचवेळी गौहर चिश्ती आणि इतर अजमेर दर्ग्याच्या मुख्य प्रवेशव्‍दारावर नुपूर शर्माच्या विरोधात प्रक्षोभक घोषणा देताना दिसले होते. ( Nupur Sharma controversy)

या प्रकरणात मला न्‍याय मिळाला आहे. मला सरकारचे आभार मानायचे आहेत, अशी प्रतिक्रिया अजमेर शरीफ दर्ग्याचे खादिम गौहर चिश्ती यांनी माध्‍यमांशी बोलताना दिली.

SCROLL FOR NEXT