अजित पवार यांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल नऊ दिवसांत येणार 
राष्ट्रीय

Ajit Pawar Plane Crash: अजित पवार यांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल नऊ दिवसांत येणार

दोन फ्लाईट रेकॉर्डर्सपैकी डीएफडीआरमधील माहिती मिळवण्यात यश; नागरी उड्डयन मंत्रालयाची माहिती

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती येथे झालेल्या विमान अपघाताच्या तपासाला गती आली आहे. लिअरजेट 45 (व्हीटी एसएसके) विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल 30 दिवसांच्या आत प्रसिद्ध केला जाईल, अशी माहिती केंद्र सरकारच्या नागरी उड्डयन मंत्रालयाने गुरुवारी दिली आहे. हा तपास तांत्रिक आणि पुराव्यांच्या आधारे केला जात असून आंतरराष्ट्रीय मानकांनुसार (आयसीएओ) 28 फेब्रुवारीपर्यंत प्राथमिक अहवाल जाहीर केला जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

नागरी उड्डाण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार विमानात बसवलेल्या दोन फ्लाईट रेकॉर्डर्सपैकी डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डर (डीएफडीआर) मधील माहिती मिळवण्यात यश आले आहे. मात्र कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डरला (सीव्हीआर) आगीमुळे तांत्रिक बिघाडामुळे त्यातील डेटा मिळवण्यासाठी मूळ उत्पादक कंपनी आणि आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. विमानाच्या अवशेषांची प्रयोगशाळेत चाचणी आणि देखभाल रेकॉर्डची तपासणी सध्या सुरू आहे.

अपघातानंतर सरकारने व्हीएसआर व्हेंचर्स या ऑपरेटर कंपनीच्या कामकाजाचे विशेष ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. 4 फेब्रुवारीपासून सुरू झालेले हे ऑडिट आता अंतिम टप्प्यात असून यामध्ये सुरक्षितता मानके, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आणि देखभाल पद्धतींची कसून तपासणी केली जात आहे. या ऑडिटच्या अहवालानंतर दोषी आढळल्यास कठोर कारवाई करण्याचे संकेतही मंत्रालयाने दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT