राष्ट्रीय

ब्रेकिंग| अजित डोवाल यांची सलग तिसऱ्यांदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदी नियुक्ती

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: अजित डोवाल यांची सलग तिसऱ्यांदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदी (NSA) नियुक्ती करण्यात आली आहे. तर डॉ. पी. के. मिश्रा हे पंतप्रधान मोदींचे प्रधान सचिव म्हणून कायम राहणार आहेत. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे.

मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने डॉ. पी.के.मिश्रा यांच्या नियुक्तीला मान्यता दिली आहे. त्यामुळे आयएसएस अधिकारी (सेवानिवृत्त) डॉ. पी. के. मिश्रा हे सोमवार १० जून २०२४ पासून पंतप्रधानांचे प्रधान सचिव म्हणून कार्यरत आहेत. त्यांची नियुक्ती पंतप्रधानांच्या कार्यकाळासह किंवा पुढील आदेश येईपर्यंत यापैकी जे आधी असेल ते ग्राह्य धरली जाईल. त्यांच्या पदाच्या कार्यकाळात त्यांना प्राधान्यक्रमाने कॅबिनेट मंत्रीपद दिले जाईल, असेही एएनआयने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

सोमवार १० जून २०२४ पासून दोन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढील आदेश येईपर्यंत, यापैकी जे आधी असेल तिथेपर्यंत माजी आयएएस अधिकारी अमित खरे आणि तरुण कपूर पंतप्रधान मोदींचे सल्लागार म्हणून काम पाहतील. ते भारत सरकारच्या सचिव पद श्रेणीत असणार आहेत, असेही एएनआयने म्हटले आहे.

SCROLL FOR NEXT