PM Narendra Modi | ‘एअरट्रंक’ भारतात करणार ३ लाख कोटींची गुंतवणूक : मोदी -
राष्ट्रीय

PM Narendra Modi | ‘एअरट्रंक’ भारतात करणार ३ लाख कोटींची गुंतवणूक : मोदी

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : भारताच्या डिजिटल पायाभूत सुविधांच्या विकासाला आता आणखी वेग मिळणार आहे. आशिया-पॅसिफिक आणि मध्य पूर्व क्षेत्रातील आघाडीची डेटा सेंटर कंपनी ‘एअरट्रंक’ भारतात तब्बल ३ लाख कोटी रुपयांची (३० अब्ज डॉलर्स) प्रचंड गुंतवणूक करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एअरट्रंकचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी रॉबिन खुदा यांच्यात झालेल्या यशस्वी बैठकीनंतर ही महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात ली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’वर या गुंतवणुकीबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, भारताचा डिजिटल प्रवास अत्यंत वेगाने पुढे जात आहे. एअरट्रंकची ही गुंतवणूक देशाच्या डिजिटल पायाभूत सुविधांच्या क्षेत्रातील आतापर्यंतची सर्वात मोठी गुंतवणूक ठरेल. या प्रकल्पांतर्गत कंपनी २०३० पर्यंत भारतात ५ गिगावॉट (क्षमतेचे डेटा सेंटर विकसित करणार आहे.

सुरतमध्ये १८ हजार कोटींच्या प्रकल्पांचे उद्‌घाटन

सुरत : जगात तेल, पेट्रोल आणि गॅसच्या पुरवठ्यात अडचणी येत आहेत. मला अभिमान आहे की, भारत आज १४० कोटी देशवासीयांच्या मदतीने या आव्हानाचा सामना करत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. सुरतमध्ये मोदी यांच्या हस्ते रस्ते, वीज आणि औद्योगिक क्षेत्राशी संबंधित १८,८०० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्‌घाटन आणि पायाभरणी करण्यात आली. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमावेळी ते बोलत होते. देशात अराजकता माजवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे. कर्नाटकची जनताही काँग्रेसच्या नकारात्मकतेमुळे संतप्त झाली आहे, असे मोदी म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT