एअर होस्‍टेसला अटक 
राष्ट्रीय

प्रायव्हेट पार्टमध्ये सोने लपवून आणत होती एअर होस्‍टेस; तपासणीत उघड, अधिकारी थक्‍क

निलेश पोतदार

पुढारी ऑनलाईन ; केरळच्या कन्नूर विमानतळावर एअर इंडिया एक्‍स्‍प्रेसच्या एका एअर होस्‍टेसकडून तब्‍बल एक किलो सोने जप्त करण्यात आले. यानंतर तीला पोलिसांनी ताब्‍यात घेतले. एअर होस्टेस तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये (Rectum) लपवून हे सोने मस्कतहून आणत होती. तीने याआधीही अनेक वेळा अशा प्रकारे सोन्याची तस्‍करी केल्‍याचे बोलले जात आहे.

ही एअर होस्‍टेस कोलकाताची असल्‍याचे समोर आले असून, तीचे नाव सुरभी खातून आहे. तिच्याकडून ९६० ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे. आरोपी खातून हिला नंतर न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता तिला १४ दिवसांची कोठडी सुनावण्यात आली.

सुरक्षा अधिकारीही आश्चर्यचकित झाले

सुरभी मस्कतहून कन्नूरला उतरलेल्या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या फ्लाइटची केबिन क्रू मेंबर होती. रिपोर्टनुसार, खातून हिने यापूर्वीही अनेकवेळा सोन्याची तस्करी केली आहे.

वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, गुप्त माहितीच्या आधारे डीआरआय कन्नूरच्या टीमने एका एअर होस्टेसला अटक केली. प्रायव्हेट पार्टमध्ये सोनं कोणत्या आकारात ठेवण्यात आलं होतं, हे पाहून विमानतळ सुरक्षा अधिकारीही आश्चर्यचकित झाले. एअर होस्टेसने तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये विशिष्‍ट आकारात सोने ठेवले होते.

भारतातील अशी पहिलीच घटना

विमान कंपनीच्या क्रू मेंबरला त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये सोने लपवून तस्करी करताना पकडले गेल्‍याची ही भारतातील पहिलीच घटना असल्‍याचे म्‍हटले जात आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT